विराट कोहलीच्या पुनरागमनाचा व्हिडीओ व्हायरल, जाणून घ्या स्टार फलंदाज RCB मध्ये कधी सामील होणार Virat Kohli’s

Virat Kohli’s आयपीएल 2024 ची उलटी गिनती सुरू झाली आहे. आयपीएलच्या 17व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी जेमतेम 6 दिवस उरले आहेत. दरम्यान, स्टार भारतीय फलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा वडील झाल्यानंतर तो भारतात परतल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

 

असे मानले जात आहे की कोहली 18 मार्च रोजी आरसीबी कॅम्पमध्ये सामील होऊ शकतो. काही रिपोर्ट्सनुसार, कोहली 19 मार्च रोजी होणाऱ्या आरसीबी अनबॉक्स इव्हेंटमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजता बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात म्युझिक इंडस्ट्रीसह अनेक स्टार्स दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय डीजे आणि संगीत निर्माता ॲलन वॉकर हे देखील या कार्यक्रमात परफॉर्म करणार आहेत.

चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सलामीचा सामना
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने 22 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. कोहली जवळपास तीन महिन्यांपासून मैदान आणि चाहत्यांपासून दूर आहे. जानेवारीमध्ये कोहलीचा इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला होता,

परंतु वैयक्तिक कारणांमुळे तो या मालिकेतून बाहेर पडला होता. काही दिवसांनी म्हणजेच फेब्रुवारीमध्ये कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि 15 फेब्रुवारीला तो दुसऱ्यांदा बाप झाल्याची माहिती दिली. पत्नी अनुष्का शर्माने मुलगा अकायला जन्म दिला. अकायच्या जन्मानंतर कोहली आता पहिल्यांदाच दिसला.

Leave a Comment

Close Visit uttamsheti