विद्या बालनला पडली ‘चला हवा येऊ द्या’ची भुरळ.. रिल्स शेयर करून माजवली खळबळ..

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वांचा लाडका असलेला झी मराठी वाहिनीवरील शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.. या कॉमेडी शोचे अख्ख्या महाराष्ट्रभर अनेक चाहते आहेत. शोमधील भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, निलेश साबळे, सागर कारंडे , भारत गणेशपुरे या कलाकारांनी सर्वांना लोटपोट करून हसवले आहे. त्यांच्या प्रत्येक कॉमेडी पंचवर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात हास्यकल्लोळ ऐकायला मिळतो. त्यामुळेच इतक्या वर्षात या शो ची क्रेझ तसूभरही कमी झाली नाही.

दरम्यान, या शोमध्ये अनेक मराठी कलाकारांसोबत हिंदी सिनेमा. त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात अनेकदा येणं केलं आहे. यावरून स्पष्ट होते की या शोचे बॉलिवूडमध्येही अनेक चाहते आहेत. याचा प्रत्यय नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडियो मधून येतो आहे. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याने सर्वत्र खळबळ माजवली आहे. विद्या बालनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

चला हवा येऊ द्या’मधील भाऊ कदम आणि डॉ. निलेश साबळे यांच्यातील एक संवाद घेऊन विद्या बालनने भन्नाट रील व्हिडीओ बनवला आहे. विद्या बालनने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या संवादात निलेश साबळे भाऊ कदम यांना विचारतात, “एका व्यक्तीला शिंका येत असतील तर तुम्ही त्याला कोणतं औषध द्याल?” त्यावर भाऊ कदम म्हणतात, “मी त्याला आधी जुलाबाचं औषध देईन आणि मग सांगेन आता शिंकून दाखव.” भाऊ कदम आणि डॉ. निलेश साबळे यांच्यातील या विनोदी संभाषणावर विद्या बालनने परफेक्ट लिपसिंक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

विद्या बालनचा हा व्हिडीओ झी मराठीच्या अनेक ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवरूनही शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं, ‘चला हवा येऊ द्या’ मधील एका पंचवर विद्या बालन यांनी केलेलं एक धमाल रील’ याशिवाय विद्या बालनने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओवर अभिनेत्री मृणाल ठाकूरने, “हाहाहा… किती क्यूट” अशी कमेंट केली आहे. तसेच इतर अनेक सेलिब्रेटींनी यावर कमेंट्स केल्या आहे.

दरम्यान, विद्या बालन ही बॉलीवूडमधील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या ती ओटीटी प्लॅटफॉर्म वर आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालत आहे. जलसा, शेरनी अशा वेबसिरीजमधून तिने चाहत्यांना आपल्या अभिनयाने चाट पाडले आहे.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप