वरुण धवन आणि नताशा होणार आई बाबा? खुद्द सलमान खानने दिला इशारा..
बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळात दिग्गज कलाकारांनी गुड न्यूज देत सर्वांना खुश केले. बॉलीवूडमधील डिवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रींनी खुशखबरी सूनावल्या. याबाबत सोशल मीडियावर त्यांचे गरोदरपण ते सुखरूप डिलिव्हरी इथवरची सारी बातमी मीडिया वाल्यांनी कव्हर केली. आणि याची चर्चा नेट कऱ्यांमध्ये चर्चा आताही चालूच आहेत. पण दरम्यान बॉलीवुडचा स्टार किलर लूक्स वाल्या वरून धवन च्या घरीही गुड न्युज येणार की काय अशी चर्चा सोशल मीडियावर थैमान घालत आहे.
वरुण धवन आणि अभिनेत्री क्रिती सेनोन सध्या त्यांच्या आगामी चित्रपट भेडिया च्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहेत. आपला सिनेमा कसा लोकांपर्यंत पोहोचेल याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. सध्या प्रमोशन साठी ते अनेक दौऱ्यावर जाताना दिसून येत आहेत. आणि याचदरम्यान या दोघांनी नुकतीच ‘बिग बॉस १६’मध्ये हजेरी लावली. आणि इथेच या गुड न्यूज बाबत खुद्द सलमानने गुपितंही उघड केलं आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर सध्या वरूनच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट परसली आहे.
प्रमोशनसाठी आलेल्या वरुण आणि क्रीतीसोबत यावेळी सलमानने एक गेम खेळला. या गेममध्ये त्यांना गाणी आणि चित्रपटांची नावं ओळखायची होती. गेमच्या शेवटी सलमान वरुणला एक सॉफ्ट टॉय देतो.वरुण सलमानला म्हणतो, मी या सॉफ्ट टॉयचं काय करु? मला तर अजून बाळसुद्धा नाही. यावर सलमान म्हणतो हे सॉफ्ट आलंय आता बाळही येईलच. सलमानच्या या वक्तव्यानंतर वरुण नताशा आई-वडिल बनणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.सलमान खानने वरुण आणि नताशाला आई-वडील होण्याचा इशारा दिल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत.
या चर्चांमुळे वरुण-नताशाचे चाहतेही आनंदी झाले आहेत.आता वरुण आणि नताशा खरंच आई-वडिल होणार आहेत का? याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. त्यामुळे सध्या तरी या अफवा आहेत.बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये फॅशन डिझायनर नताशा दलालसोबत लग्न केले.वरुण धवन आणि नताशा दलाल हे बी-टाऊनमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहेत.
वरुणच्या भेडिया चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे सिनेमात वरुण धवन, क्रिती सॅनन आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हॉरर-कॉमेडी चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. हा चित्रपट २५ नोव्हेंबर २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे.