लोककलावंत उत्कर्ष शिंदेच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष…”मला असं म्हातारं व्हायचं आहे” काय आहे ही भन्नाट पोस्ट एकदा वाचाच..

0

लोककला आणि लोकनृत्य ही आपल्या महाराष्ट्राची केवळ शान नाही तर ओळखदेखील आहे. डफली आणि ढोलकीच्या तालावर ठेका धरत आपल्या राज्याची महती सांगण्याचा आनंद हे लोककलावंत घेत असतात. असे अनेक कलाकार आहेत ज्याचे कित्येक फॅन्स त्यांना फॉलो करत असतात. सध्या सोशल मीडियावर एका लोककलावंताची एक पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. ज्यामुळे तो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

लोककलेचा पारंपरिक वारसा जपणारा प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असतो. इन्स्टाग्रामवरही उत्कर्षचा मोठा चाहता वर्ग आहे आणि उत्कर्ष नेहमीच त्याच्या कामासोबतच इतर अपडेटही चाहत्यांना देत असतो. याशिवाय तो अनेकदा सोशल मीडियावर व्हिडीओ देखील शेअर असतो. जे व्हायरल होताना दिसतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. उत्कर्ष शिंदेनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ बराच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये उत्कर्ष शिंदे एका आजींसोबत कोळीगीत गाताना दिसत आहे.

उत्कर्ष शिंदेने या आजींचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असताना अगदी लक्षवेधक कॅपशन लिहिले आहे ज्यामुळे या पोस्टला चाहत्यांचे प्रेम मिळत आहे. त्याने लिहिलं, ‘आजच्या रिऍलिटी शो च्या युगात कैक कलाकारांना वाव मिळतो.ते टीव्हीवरही दिसतात पण काही असेही कलाकार आहेत ज्यांना परिस्तिथीमुळे स्वतःला सादरच नाही करता आलं त्यांचं काय?

अलिबागवर आधारित एक गाणं करण्यासाठी मी अलिबागमध्ये शूटसाठी गेलो असता .एका सीनसाठी अलिबागच्या मच्छी मार्केटला जाण झालं आणि तिकडेच मला भेटली एक मस्तमौला, बाहुली सारखी नाचणारी, गाणारी मासे विकणारी आजी. मला पाहताच जिने तू प्रल्हाद शिंदे- आनंद शिंदेच्या घरचो काय? असे विचारलं आणि अस विचारातच उत्साहाने गाणं सुरु केलं आणि मग काय मी पण माझी शूटिंग थांबवून त्या आजी कडचा लोककलेचा खजिना ऐकत पाहत राहिलो.’

यापुढे तो लिहितो की, ‘त्या आजीने भरभरून तिचे कोळीगीत तर ऐकवलेच पण महान गायक विठ्ठल उमप व प्रल्हाद शिंदे ह्यांच्या त्या काळातील अलिबागमधल्या त्यांच्या गाण्याच्या कारेक्रमाच्या कैक आठवणी सांगितल्या. मला तर जसा खजिनाच सापडला. हातावर पोट असणारा, समुद्राला भिडणारा, शहाळ्या सारखं मोठं, प्रेमळ मन असणारा हा धाडसी कोळी समाज किती गोड, किती ऊर्जेने भरलेला आहे ही प्रचिती ह्या मासे विकणाऱ्या नाचत गात कोळी गीत गाणाऱ्या आजीला पाहून आली आणि मनात विचार आला “आयुष्यात म्हातारपण जेव्हा केव्हा येईल तेव्हा मला पण असच एनर्जेटिक एव्हरग्रीन म्हातारा व्हायचंय.”आजीला भेटून त्यांचे कोळीगीत ऐकून माझी तर ऊर्जा द्विगुणित झाली, मी शूटिंग संपवलं आणि मग सुकं म्हावरा, कोळंबी, सुकट, पापलेट ,सोलकडीवर ताव मारत काय ते मासे… काय तो समुद्र… काय तो कोळी समाज… सगळं ओके मधी हाय… म्हणत अलिबागचा निरोप घेतला.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

दरम्यान उत्कर्ष शिंदेच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहे. इतकंच नाही तर त्याच्या या पोस्टला भरभरून लाइक्स देखील मिळाले आहेत. त्याने आता शेअर केलेला हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप