मित्रहो घराजवळ किंवा गल्लीत असणारे कुत्रे नेहमी आपली एक टीम तयार करून सज्ज असतात. दिवसा तर हे हमला करत असतातच शिवाय रात्री देखील त्यांचा दरारा भरपूर प्रमाणात असतो त्यामुळे लहान मुलांना देखील त्यांच्या जवळ नेण्यास भीती वाटते. रात्री अपरात्री यायला कधी कधी उशीर होत असतो, त्यामुळे घरी येताना रात्री जागत असलेली कुत्र्यांची टोळी पाहून मनात धास्ती निर्माण होतेच कारण त्यांना आपण समजावू देखील शकत नाही. रात्रीच्या वेळी बाईकवाल्यांच्या पाठी लागतात कुत्रे. त्यामुळे गाडीवरील असलेला बॅलन्स देखील हटतो.
बॅलन्स हटल्याने अनेक अपघात सुद्धा झाले आहेत, अपघात साधे झाले तर काही वाटत नाही पण जर या क्षुल्लक कारणामुळे मोठा अपघात झाला तर कळते की यावर देखील उपाय करायला हवा. रात्रीच्या वेळी गाडीवरून प्रवास करताना अनेक ठिकाणी कुत्र्यांची टोळी बसलेली दिसते, ते बाईकवर भुंकतात किंवा पाठी लागतात. त्यामुळे कुत्रे पाठी लागले की चालक असणारे गाडी आणखीन वेगाने पळवतात. काहीजण तर असेही असतात जे घाबरून गाडीवरील बॅलन्स सोडतात. त्यामुळे गरज नसताना देखील ते पडतात.
मित्रहो एक उपाय आहे असा ज्यामुळे तुम्ही कुत्र्यांना रात्रीच्या वेळी बाईकचा पाठलाग करण्या पासून थांबवू शकता. मित्रहो ही एक मानसशास्त्रीय युक्ती आहे, तुम्ही कधी निरीक्षण केलं असेल किंवा विचार तरी केलाच असेल की कुत्रे जास्त तेव्हाच भुंकतात जेव्हा आपण गाडी अधिक वेगाने पळवतो. जर गाडी हायस्पीडवर असेल तरच कुत्रे अधिक भुंकतात. शिवाय ते पाठलाग देखील करतात, कारण त्यांना नेहमीच धावणारी गोष्ट पकडायची असते. त्यामुळे ते भरधाव वेगाने धावणाऱ्या गाडीच्या पाठी लागतात.
मित्रहो आपण जरा याच्या उलट वागायचे, वाटेत कुत्रा दिसत असेल तर गाडीची स्पीड कमी करायची. गाडी शिस्तीत चालवायची, आणि मग तिथून जायचे. त्यामुळे कुत्रे देखील शांत बसतील व ते पाठीमागे लागणार नाहीत. तसेच त्यांच्या समोरून जाताना त्यांच्या कडे अजिबात पाहू नये. कुत्र्यांकडे न पाहता शिस्तीत जावे, त्यांच्या कडे लक्ष द्यायचे नाही. असे केल्याने ते तुम्हाला घाबरवण्याचा किंवा तुमच्यावर भुंकण्याचा प्रयत्न करणार नाहीत. गाडी हळू हळू समोरून गेल्याने ते देखील शांत बसतील, त्यांचे तुमच्याकडे जास्त लक्ष जाणार नाही.
वेळ रात्रीची असो किंवा दिवसाची जर गाडी तुम्ही हळूहळू नेला तर अपघात टळेल, कुत्रे देखील पाठी लागणार नाहीत शिवाय लक्ष न दिल्या मुळे ते भुंकणार देखील नाही. त्यांच्या समोरून गेल्या नंतर पूढे जाऊन तुम्ही तुमच्या गाडीची स्पीड वाढवली तरी चालेल. त्यामुळे तुम्हाला वेळ देखील होणार नाही आणि कुत्रे सुद्धा पाठी लागणार नाहीत. त्यामुळे मित्रहो रात्रीच्या वेळी शिस्तीत गाडी चालवत जा. आजचा हा लेख व उपाय कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच जर लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.