‘आई वडील झाल्यानंतर..’, हटके अंदाजात उर्मिलाने शेअर केला विडिओ..
सध्याच्या घडीला कोणतीही गोष्ट येत नसली की आपण गुगल किंवा युट्यूब माध्यमांचा वापर करतो. त्यावरील व्हिडिओज पाहून त्वरित माहिती मिळवणे सोपे झाले आहे. यासोबतच युट्यूब माध्यमाने काहींना आपल्या कलेची जाणीव करून दिली तर काहींना जगाशी ओळख करून दिली. याच माध्यमात युट्यूब ने अनेकांना अगदी घरोघरी पोहचवले आहे. रेसिपीज, गाणी, शॉर्ट फिल्म्स यांना डिजिटल दुनियेत जागा मिळवून दिली. त्यावरील फॉलोअर्समुळे त्यांचे चांगलेच नाव झाले आहे.
ज्याप्रमाणे मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील कलाकारांचे अनेक फॅन्स आढळतात. त्याचप्रमाणे युट्यूबवरील युट्यूबरचे देखील अनेक फॅन्स असलेले पहायला मिळते. या स्टार्सना अनेक लोक फॉलो करत असतात. त्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी उत्सुक देखील असतात. नुकताच एका प्रसिध्द युट्यूबर बद्दलची आनंद वार्ता समोर आली आहे. जे ऐकून तिचे फॅन्स खूप खुश झाले आहेत.
ती युट्यूबर आहे अभिनेत्री उर्मिला निंबाळकर.. ती सध्या चांगलीच फॉर्म मध्ये असल्याचे पाहायला मिळते. तिला कोणी ओळखणार नाही असे होणे क्वचितच संभव असेल. युट्यूबवर आपला फॅनबेस निर्माण करणारी उर्मिला इन्स्टाग्रामवरही सक्रीय असून कायम नवनवीन व्हिडीओ घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत असते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
View this post on Instagram
वर्षभरापूर्वी उर्मिलाने अथांग या गोड चिमुकल्याला जन्म दिला. अलिकडेच त्याचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे उर्मिलाप्रमाणेच तिचा लाडका चिमुकलाही लोकप्रिय बनला आहे. आणि तो स्टार किड म्हणून ट्रेंडमध्ये असतो. त्यामुळे उर्मिला बऱ्याचदा या चिमुकल्यासोबतचे व्हिडीओ तिच्या अकाऊंटवर शेअर करत असते. यावेळी तिने पालक झाल्यानंतर आपल्या आवडीनिवडींना कशी मुरड घालावी लागते हे मजेशीर अंदाजात सांगितलं आहे. जे पाहून चाहते हसून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
“आई-बाप झाल्यावर लईच सज्जन वागावं लागतं. चॅाकलेट- लाईम ज्युस मी खाल्लं, तर अथांग तेच मागणार म्हणून फक्त लाईम रंगाचा टॅाप मिळेल!”, असं कॅप्शन देत उर्मिलाने एक व्हिडीओ शेअर केला आहे.दरम्यान, या व्हिडीओमध्ये उर्मिला कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. तिच्यावर लाइक्स आणि कॉमेंट्स चा पाऊस पाडत तिचा फिटनेस फंडा जाणून घेण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
उर्मिलाने अनेक हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. उर्मिलाने स्वतःचे यूट्यूब स्टुडिओ सुरू केले आहे. तिला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे.