सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात.अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक जोडी आहे विक्रम गायकवाड आणि त्याच्या पत्नीची. विक्रम गायकवाडची पत्नीदेखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. चला तर जाणून घ्या कोण आहे विक्रम गायकवाडची पत्नी.. ?
विक्रम गायकवाड याने मराठी मालिका तसेच चित्रपट सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. झी मराठी वाहिनीवरील उंच माझा झोका मालिकेने विक्रमला खऱ्या अर्थाने ओळख दिली. याच मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिके आधी त्याने ‘सह्याद्री’ वाहिनीसाठी २-३ मालिका आणि नंतर ‘स्वप्नांच्या पालिका’मध्ये वैदेहीच्या भावाची म्हणजेच आशुतोष परांजपेची भूमिका साकारली. ज्याने त्याला थोडेफार पैसे मिळण्यास मदत झाली. अस त्याने एकदा मुलाखतीत सांगितले.
मुंबईत येण्यापूर्वी तो एकांकिका, कथा सांगण्याच्या स्पर्धा आणि राज्यस्तरीय एकांकिका नाटकांमध्ये भाग घ्यायचा. फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज या चित्रपटांतून तो नेताजी पालकर तर कधी चिमणाजी देशपांडे यांची भूमिका साकारताना दिसला.
स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत विक्रमने शहाजीराजेंची भूमिका साकारली होती. बंदिशाळा, लपाछपी, तुकाराम, डॉ प्रकाश बाबा आमटे, ४ इडियट्स अशा चित्रपटात त्याने विविधांगी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. लग्नानंतर अक्षता फारशी कोणत्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळाली नाही. अक्षता कुलकर्णी गायकवाड हिला तुम्ही अनेक मालिकेतून पाहिले असेल. तिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
अभिनेत्री अक्षता कुलकर्णी गायकवाडने अनेक नाटक, मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. कथा अभिवाचन स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तिने बक्षीस मिळवली आहेत.
अशातच हिंदी मालिका मेरे साईं मधून ती महत्वाची भूमिका साकारताना दिसली. बऱ्याच प्रतीक्षेनंतर अक्षता पुन्हा एकदा मराठी मालिकेतून सक्रिय झालेली पाहायला मिळाली. योग योगेश्वर जयशंकर मालिकेत अक्षता वंदनाची भूमिका साकारत आहे ही भूमिका विरोधी ढंगाची असल्याने प्रेक्षकांच्या रोषाला तिला सामोरे जावे लागत आहे. २०१३ साली अक्षताने लोकप्रिय अभिनेता विक्रम गायकवाड सोबत लग्न केले.
मुलगी तावीच्या जन्मानंतर तिच्या पालनपोषणाची तिने जबाबदारी पार पाडली. बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मराठी मालिकेत झळकत आहे. त्यामुळे वंदनाची भूमिका अक्षतासाठी तितकीच महत्त्वाची आहे.