प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या घरी आले दोन पाहुणे.. पोस्ट शेयर करत दिली माहिती..
युवा कीर्तनकार ही ओळख, कीर्तनकाराचा वेगळा चेहरा, अध्यात्माचं मार्गदर्शन आणि यासोबतच अनलॉक इन्टरटेन्मेंट करायला, पुन्हा एकदा या संप्रदायाला वेगळं वळण द्यायला मी शिवलीला बाळासाहेब पाटील येत आहे ‘बिग बॉस’च्या घरात,’ असं म्हणत शिवलीला पाटील यांनी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला होता. घरात प्रवेश
शिवलीला पाटील या वारकरी संप्रदायातील लोकप्रिय अशा कीर्तनकार आहेत. सोशल मीडियावर शिवलीला या चांगल्याच प्रसिद्ध आहेत, पण तरीही ‘बिग बॉस’च्या घरात कीर्तनकार म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान ‘मात्र स्वतःवर विश्वास असला तर सगळं नीट होतं. माझा स्वभाव आणि माझे विचार या जोरावर मी या घरात राहू शकेन,’ असं म्हणत आपल्या बिग बॉसच्या घरात येण्याचं समर्थनच केलं होत.
शिवलीला पाटील या शो मध्ये सहभागी झाल्यानंतर तब्बेतीचे कारण देत त्यांनी शो मधून एक्झिट घेतली त्यांच्या एक्झिट नंतर बिग बॉसच्या व्होटिंग लाइन्स बंद करण्यात आल्या होत्या. याचे कारण म्हणजे शिकलेला पाटील याच्यावर अनेकांनी टीका केली होती. कारण एका कीर्तनकार महिलेने अशा प्रकारे एखाद्या रियालिटी शोमध्ये सहभागी होऊन समाजाची बदनामी करू नये. हे प्रकरण चांगलच तापले होते.
वारकरी संप्रदायाची बदनामी करू नये, असे म्हणत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवलीला पाटील ही या शो मधून बाहेर पडली होती. तिने नंतर पंढरपूर मध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये जाहीर माफी मागून वारकरी संप्रदायाच्या जर माझ्यामुळे भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागते, असे म्हटले होते. एकूणच काय शिवलीला पाटील ही कायमच चर्चेत असते.
नुकतेच त्यांच्या घरी एक नाही तर दोन पाहुणे आल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. ही बातमी वाचून सर्वांना अनेक प्रश्न पडले आहेत. तर याच उत्तर हे आहे की शिवलीला पाटील यांनी दोन गाड्या खरेदी केल्या आहेत. एक फोर व्हीलर गाडी खरेदी केली आहे, तर दुसरी गाडी टू व्हीलर आहे.
View this post on Instagram
ही आनंदाची माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेयर करत दिली आहे. “माझ्या घरी दोन पाहुण्यांचे आगमन झाले आहे”, असे त्यांनी म्हटले आहे आणि टू व्हीलर सोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्यांच्या फोटोला अनेकांनी लाइक्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram