तुझेच गीत मी गात आहे मालिकेतील कलाकारांचे कुटुंबीय ही आहेत प्रसिद्ध कलाकार..जाणून घ्या कोण आहेत ते..
छोटया पडद्यावरील मालिकांमधील अनेक जोड्या नेहमी फेमस होत असतात. छोटया पदादवरील अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये सोबत काम करत असणारे कलाकार एकमेकांचे स्नेही असतात. किंवा एकच कुटुंबातील असतात. तर काही वेळा ते नवरा बायको देखील असतात. दरम्यान, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये काम करणारे कलाकार व त्यांचे कुटुंबीय कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर जाणून घेऊया की या मालिकेत काम करत असणाऱ्या कलाकारांचे खरे कुटुंबीय कोण आहेत.
तुझेच मी गात आहे या मालिकेमध्ये मुख्य अभिनेता मल्हार ही भूमिका सध्या लोकप्रिय ठरत आहे. मल्हारची भूमिका अभिनेता अभिजीत खांडेकर यांनी साकारली आहे. त्याच्या पत्नीचे नाव सुखदा खांडकेकर असे आहे. सुखदा खांडकेकर व अभिजीत खांडेकर दोघेही अभिनेता अभिनेत्री आहेत. दोघांनीही अनेक चित्रपटात काम केले आहे. सुखदा सध्या सोनी टीव्हीवरील अहिल्याबाई होळकर मालिकेत काम करते आहे.
या मालिकेत मोनिकाचे पात्र प्रिया मराठे साकारत आहे.अभिनेत्री प्रिया मराठे ही प्रिया मराठे हिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्रियाची सर्वात लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे तू तिथे मी. प्रियाने हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे कसम से, पवित्र रिश्ता, बडे अच्छे लगते है. या मालिकेत तिने काम केले आहे. तिचा पती शंतनु मोघे देखील उत्कृष्ट अभिनेता आहे. तो सध्या आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत अविनाश ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
या मालिकेमध्ये स्वराची भूमिका देखील अतिशय लोकप्रिय ठरत आहे. स्वराची भूमिका बालकलाकार अवनी तायवडे हिने साकारली आहे तर स्वरा हिच्या वडिलांचे नाव विष्णू तायवडे असे आहे, तर आईचे नाव शिल्पा तायवडे असे आहे. तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत असते.
या मालिकेमध्ये पिहू हिची भूमिका देखील लोकप्रिय ठरली आहे. तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. ही भूमिका अवनी जोशी हिने साकारली आहे. अवनीला गायनाची देखील आवड आहे. हे गुण तिला तिच्या आई- वडिलांकडूनच मिळाले आहेत. कारण अवनीचे आई वडील देखील गायक आहेत. अवनीचे वडील अनिरुद्ध जोशी आणि आई रसिका जोशी हे दोघेही गायक आहेत.
मालिकेत क्षमाची भूमिका देखील लोकप्रिय होताना दिसत आहे. ही भूमिका अभिनेत्री पल्लवी वैद्य हिने साकारली आहे. पल्लवी वैद्य हीच लग्न झाले असून तिच्या पतीचे नाव केदार वैद्य असे आहे.