तु चाल पुढे मालिकेतील अश्विनीचा पती आहे सुप्रसिद्ध अभिनेता.. कोण आहे तो? जाणून घ्या..

0

झी मराठी वाहिनीवर सध्या अनेक मालिका येऊ घातल्या. त्यापैकी एक म्हणजे तू चाल पुढे.. या मालिकेनं अगदी कमी काळात प्रेक्षकांच्या मनात पक्की जागा मिळवली आहे. ही मालिका वरचेवर चर्चेत असतेच पण या मालिकेचे चर्चेत असण्याचे एक कारण म्हणजे या मालिकेची नायिका अश्विनी अर्थात अभिनेत्री दीपा परब. तिने या मालिकेच्या माध्यमातून मराठी सिनेइंडस्ट्रीत दमदार कमबॅक केले. पण तुम्हाला माहित आहे का दीपाचा नवरा देखील मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे हा अभिनेता..

दरम्यान, तू चाल पुढे या मालिकेत अश्विनीच्या भूमिकेत दीपा आपल्याला पाहायला मिळते आहे.दीपाने मराठा बटालियन या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. हा चित्रपट २००२ मध्ये आला होता.त्याचप्रमाणे छोटी मा मालिकेतूनही तिने आपल्या अभिनयाची छाप उमटविली होती.दीपा परब-चौधरी हिने चित्रपट, मालिकेशिवाय नाटकातही काम केले आहे.स्टार प्लस वाहिनीवरील शौर्य और अनोखी कहानी या मालिकेत तिने काम केले आहे.केदार शिंदे यांच्या ऑल दी बेस्ट या नाटकात ती दिसली होती. त्याचबरोबर सुबोध भावे प्रसाद यांच्या सोबतच्या क्षण या चित्रपटात ही दिसली होती. दीपाने थोडी खुशी थोडा गम, छोटी मा यासारख्या मालिका केल्या आहेत.

तर दीपाच्या नवऱ्याचं नाव अंकुश चौधरी असून तो मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता आहे.दीपा आणि अकुंशने २००७ साली लग्न केले. आणि त्यांची लव्ह स्टोरी देखील तितकीच हटके आहे. अंकुश चौधरी आणि दिपा परब एकमेकांना १० वर्ष डेट करत होते. आता त्यांच्या लग्नाला जवळापास १२ वर्षं उलटून गेली आहेत.

दिपा परब आणि अंकुश चौधरी यांचं शिक्षण एकाच कॉलेजमध्ये झालं. मुंबईच्या महर्षी दयानंद कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अंकुश आणि दिपा यांची ओळख अभिनयामुळेच झाली. दोघांनाही अभिनयाची प्रचंड आवड त्यामुळे कॉलेजच्या नाटक-एकांकिकांमुळे या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मग हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. कॉलेजमध्ये असताना या दोघांनीही अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केलं होतं.

कॉलेजमधली लव्हस्टोरी पुढेही तशीच राहिली. दिपा आणि अंकुशनं २००६ मध्ये त्यांच्या नात्याला नवं वळण देण्याचा निर्णय घेत साखरपुडा उरकला. त्यानंतर एका वर्षानं हे दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. आता या दोघांना प्रिन्स नावाचा एक गोड मुलगा सुद्धा आहे. अंकुश चौधरी अनेकदा आपल्या फॅमिलीसोबत फोटो शेअर करत असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप