मराठी मालिकांचा लेखाजोगा आला समोर, कोण आहे टीआरपी रेसमध्ये अव्वल घ्या जाणून…
छोटया पडद्यावरील मराठी मालिका आता दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होत असलेल्या पहायला मिळत आहे. पण कोणती मालिका किती आवडीने पाहिली जाते याचा अहवाल जाणून घेण्यात देखील चाहत्यांची तितकीच रुची असते. तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे ना? की तुमची आवडती मालिका टीआरपी चार्ट वर कोणत्या क्रमांकावर आहे? या आठवड्यात कोणत्या मालिकेने प्रेक्षकांचं सर्वात जास्त मनोरंजन करून पहिल्या स्थानावर बाजी मारली हे जाणून घ्या.
टिआरपीच्या रेसमध्ये दहाव्या नंबरवर आहे स्टारप्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिका. मालिकेतील एकोपा प्रेक्षकांना खूप भावतो. शिवाय मालिकेतील प्रत्येक पात्र हे चाहत्यांना आकर्षित करते.
टीआरपीच्या रेसमध्ये नवव्या स्थानी आहे झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका. इंद्र आणि दिपू च्या लग्नाचा ट्रॅक चाहत्यांना आवडतो आहे. स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ ही मालिका आठव्या स्थानावर आली.
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका गेल्या काही आठवड्यांप्रमाणे आजही सातव्या क्रमांकावरच आहे. अविनाश हा दिवसेंदिवस कुरघोडी करत नेहाला अडकवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यात त्याला सिम्मी साथ देते आहे. त्यामुळे चाहते आत्मीयतेने ही मालिका पाहतात. तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे.ही मालिका स्टार प्लस वरील कुल्फी कुमार बाजेवाला मालिकेशी साम्य सांगणारा आहे.
टिआरपीच्या रेसमध्ये स्टार प्रवाह वाहनिवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका 5.8 टीआरपीसह पाचव्या स्थानावर विराजमान आहे. अप्पूची निरागसता चाहत्यांना भावते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘फुलाला सुंगध मातीचा’ ही मालिका या आठवड्यात चौथ्या क्रमांकावर आली आहे. या आठवड्यात या मालिकेला 6.1 रेटिंग दिलं आहे. पोलिस अधिकारी झाल्यानंतर येणाऱ्या अडचणींना ती कशी तोंड देते ते पाहण्यात प्रेक्षक रस घेतात.
आई कुठे काय करते’ या मालिकेनं या आठवड्यात तिसरा क्रमांक गाठला आहे. सध्या मालिकेत अभी घर सोडून गेला आहे.आणि अनघा अरूंधतीची साथ देते आहे. हा ट्रॅक पाहण्यात चाहते नेहमीच उत्सुक असतात.
स्टार प्रवाह वाहिनीवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका टीआरपी रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. दरम्यान, गौरी आता गोड बातमी देणार असल्याचे कळले आहे त्यामुळे मालिकेला काय नवे वळण येईल ते पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.टीआरपी रेसमध्ये या आठवड्यात 6.7 रेटिंगसह 1 नंबरवर स्टार प्रवाह वरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेनं बाजी मारली आहे.