पुण्याच्या झोपडपट्टी मधील हा तरुण..आज आहे प्रसिद्ध अभिनेता..टपोरी,गुंड वाटणाऱ्या मुलाने मिळवली भूमिका..

मित्रहो कोणाचे नशीब कशी वळण घेईल काही सांगता येत नाही, अचानक काहीही होऊ शकते त्यामुळे आयुष्य जगताना भविष्य माहीत नसल्याने आपण आहे त्यातच रेंगाळत राहतो की काय अस वाटत असते मात्र काहींचे नशीब झोपडपट्टी मधून कधी महालात झळकेल कळायचे नाही. मित्रहो असाच एक तरुण जो पुण्याच्या झोपडपट्टी मधील टपोरी होता आणि आज तोच मुलगा एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या अनेक भूमिकांनी पडद्यावर भलतीच जादू केली आहे. ही जादू रसिकांच्या मनावर देखील अधिराज्य गाजवत आहे. रातोरात याला प्रसिद्धी मिळाली आहे.

हा अभिनेता आहे “बेरोजगार” फेम संभाजी ससाणे. त्याचा हा चित्रपट पडद्यावर खूप लोकप्रिय होत आहे, या सिरीजमध्ये त्याने साकारलेला पापड्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पडद्या पासून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा त्याचा हा प्रवास खूप कठीण रस्त्यावरील आहे. त्याच्या यशाचे सर्वानाच खूप कुतूहल वाटत असते. पुण्यातील हिराबागेत झोपडपट्टी मध्ये संभाजीचे आयुष्य गेलं. त्यावेळी त्याच्या घरची परिस्थिती बेताची होती. सुरुवातीपासूनच त्याला अभिनयाची आवड होती, गणेश उत्सवात तो प्ले करायचा.

पुढे त्याने आपले शिक्षण पूर्ण करून घेतले, त्यानंतर त्याने ड्रामा स्कुल मुंबई मधून अभिनयाचे धडे गिरवले. दरम्यान तिथून काही चांगल्या नाट्य संस्थांच्या माध्यमातून त्याचा नाटकाचा प्रवास सुरू झाला. अनेक नाटकांसाठी त्याने बॅक स्टेजचे काम सुद्धा केले आहे. आपल्या आजवरच्या प्रवासाबद्दल बोलताना संभाजी सांगतो “आयुष्यात अभिनयच करायचा अस काही ठरलेलं न्हवत. जेव्हा तुम्ही झोपडपट्टी मध्ये वाढता तेव्हा रोज शंभर गोष्ट तुम्हाला खाली घेऊन जाऊ शकतात. मी खूप बंडखोर होतो,गुंड प्रवृत्तीचा होतो. अस वाटत माझ्या आईवडिलांनी मला कसं सांभाळलं असेल,

पण नाटक करण्यात मला मजा येत होती, आणि याच एका गोष्टीने मला तारलं. आता पर्यंत कलाकार म्हणून एक गोष्ट शिकलोय, तुम्हाला अपयश पचवायची ताकद ठेवावी लागते. त्याहूनही यश मिळालेच तर तेही पचवता आले पाहिजे.” संभाजीने ड्रामा स्कुल नंतर काही नाटकात काम केलं. आता त्याचे “लव्ह अँड लावणी”हे नाटक लवकरच पडद्यावर येत आहे. नाटकात तर त्याच्या भूमिका रंगात आल्याचं आहेत पण सोबतच त्याने “वाघेऱ्या”, “लालबत्ती” या चित्रपटात काम केलं आहे. यातील त्याच्या भूमिका सुद्धा चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत.

विविध भूमिका पार पाडतानाच त्याला “बेरोजगार” चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यातील पापड्या हे पात्र प्रेक्षकांना भरपूर प्रमाणात आवडले आहे. लवकरच “बेरोजगार २”मधून पापड्या पडद्यावर पुन्हा झळकेल. त्याच्या पुन्हा होणाऱ्या एन्ट्रीसाठी लोक खूप उत्सुक आहेत. त्याला नेहमी अशीच प्रसिद्धी व लोकप्रियता मिळत राहो ही सदिच्छा. त्याच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Image and Video credit: Marathi World Entertainment

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप