सध्या टिव्ही इंडस्ट्री मधील कलाकार यशाचे शिखर गाठत आहेत. आणि याचाच एक भाग बनून त्यांनी साल २०२२ मध्ये अनेक कलाकारांच्या घरी नव्या पाहुण्यांचं म्हणजेच नव्या आलिशान गाड्यांचं स्वागत झालं. कोणत्या कलाकारांनी कोणच्या नव्या कार घेतल्या आहेत ठाऊक आहे का? जाणून घ्या या आजच्या या लेखात..
बिग बॉस मराठी ३ चा विजेता विशाल निकमनं टाटा हॅरिअर ही कार खरेदी केली. विशाल निकमने छोटया पडद्यावरील दख्खनचा राजा जोतिबा मालिकेत जोतिबा ची उठावदार भूमिका साकारून चाहत्यांचे मन जिंकले आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात लाडका आणि हसमुख अभिनेता रितेश देशमुख आणि तितकीच खेळकर अभिनेत्री जेनिलिया देशमुख यांनी इलेक्ट्रिक लक्झरीयस कार खरेदी केली. दरम्यान त्यांचा वेड हा सिनेमा चाहत्यांना वेड लावण्यासाठी सज्ज आहे.
छोटया पडद्यावरील बिग बॉस मराठी फेम आदिशनं त्याच्या ३० व्या वाढदिवशी स्वत:ला नेक्सॉन कार गिफ्ट केली.तो ‘रात्रीस खेळ चाले’, ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आला.’सेक्स, ड्रग्ज अॅण्ड थिएटर’ या वेब सीरिजमधून तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला.
मानसी नाईकला नवरा प्रदीपनं दिवाळीत ऑडी कार गिफ्ट केली. पण सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सोशल मीडियावर तुफान माजवले आहे. दरम्यान याबाबत दररोज काही ना काही अपडेट येत असते.
जीव माझा गुंतला फेम योगितानं देखील स्वत:ची पहिली कार खरेदी केली. तिनं स्वत:ला ह्युंदाई कार गिफ्ट केली. योगिताने राडा या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
अभिनेत्री परी तेलंगनं देखील नवी कार घेतली.परीने मराठी सोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील काम केल आहे.तू माझा सांगाती, आभाळमाया, लक्ष्य या मालिकेतून परी घराघरांत पोहचली. फू बाई फू, महाराष्ट्राची हास्यजत्रा, धूम धडाका- कॉमेडीचा सर्जिकल स्ट्राईक यांसारख्या कॉमेडी शोमध्ये परीने काम केल आहे. Mr&Mrs लांडगे, बाई आमिबा आणि स्टील ग्लास, माझी माय सरसोती या नाटकांमध्ये परीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत
या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर अभिनेत्री लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी महागडी कार खरेदी केली.
अभिनेत्री अन्वितानं देखील ७-८ महिन्यांपूर्वी ब्राऊन कलरची हुंदाई कार खरेदी केली आहे.
अभिनेत्री पुष्कर जोगनं डिस्कव्हरी स्पोर्ट लॅर्डओव्हर ही रेड कलरची कार खरेदी केली. पुष्कर जोग हा मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेला अभिनेता आहे.