असा होणार माझी तुझी रेशीम गाठ मालिकेचा शेवट…
छोटया पडद्यावर अनेकदा काही अशा मालिका येतात ज्या अल्पावधीतच लोकप्रिय बनतात. त्यांची प्रसिद्धी इतकी होते की ते चाहत्यांच्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातात. त्यांना दिवसातून एकदा टिव्ही वर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशीच प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याची बनलेली मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीम गाठ..
यश आणि नेहाच्या नात्याला आता अर्थ तर मिळाला चिमुकल्या परीच्या असण्याने त्यांच्या या त्रिकोणी कुटुंबाला पाहण्यात चाहत्यांना फार आनंद मिळतो. पण अचानकपणे नेहाच्या पहिल्या नवऱ्याच्या येण्याने मालिका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. सतत अविनाश सिम्मीसोबत मिळून नेहाच्या आयुष्यात अडथळे निर्माण करत आहे. यामुळे मालिकेत नवनवे ट्विस्ट येत आहेत. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ हा प्रेक्षकांची आवडती मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यश व नेहाच्या प्रेमाची कथा सांगणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
यश व नेहाच्या नात्यात दुरावा आल्याने परीच्या मनावर याचा परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे परीला तिचा खरा बाबा कोण आहे हे कळल्यानंतर मालिकेत पुढे काय होईल यश व नेहा शिवाय परी आणि यश यांच्यात दुरावा येईल का या प्रश्नांची उत्तरे मालिकेत मिळतीलच.पण मालिका इतक्या उत्कंठावर्धक वळणावर असताना अचानकच मालिका बंद होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
सध्या झी मराठी वाहिनीच्या ओफिशियल इंस्टाग्राम पेजवर नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला. दार उघड बये अस या मालिकेचं नाव आहे. या प्रोमो मुळे माझी तुझी रेशीम गाठ मालिकेच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. प्लीज मालिका बंद करू नका.. इतकी चांगली मालिका का बंद करत आहात.., नेहमी चांगल्या मालिकाच का लवकर बंद होतात.. असे केविलवाणे कॉमेंट्स चाहत्यांनी केले आहेत.
दरम्यान, मालिकेचा शेवट जवळ आल्याने कलाकार देखील मालिकेचा शेवटचा भाग शूट करत आहेत. दार उघड बये ही मालिका येत्या 19 सप्टेंबरला सुरू होणार आहे आणि 17 सप्टेंबरला माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत त्यामुळे माझी तुझी रेशीमगाठी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे कन्फर्म झाले आहे. यामुळे चाहते खूप नाराज आहेत. शेवटचा भाग पाहण्यासाठी चाहते चांगलच नाराज असेल तरी उत्सुक आहेत.