झाली तयारी पुष्पाला आणण्याची.. Pushpa 2 मध्ये अल्लू अर्जुनसोबत झळकणार साऊथचा हा सुपरस्टार
सध्या जिकडे बघावं तिकडे साऊथ मुव्हीज चा बोलबाला आहे. प्रत्येक चाहत्यांच्या मनावर आता साऊथ स्टार्सचा पगडा पडला आहे. आणि हा बदल जाणवून आला तो केजीएफ सिनेमा मुळे.. त्यानंतर सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमाने तर हाहाकार माजवला आहे. या सिनेमात साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांच्या जोडीने सर्वांना वेड लावत जगभरातील चाहत्यांचे प्रेम मिळवले. मैं झुकेगा नाही म्हणत पुष्पा ने सर्वांना झुक्कवके आहे. शिवाय या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत अनेक नवे रेकॉर्ड बनवण्यात एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.
या चित्रपटाचे डायलॉग्स आणि गाणी सतत लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळतात. चित्रपटाच्या दमदार अशा पहिल्या पार्टनंतर आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची उत्सुकता लागून आहे. दरम्यान, अल्लू अर्जुन १२ डिसेंबरपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. पण याच दरम्यान चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.
मेकर्सनी आता ‘पुष्पा २’ चित्रपटाची तयारी केली आहे. ‘पुष्पा’चे दिग्दर्शक सुकुमार हे ‘पुष्पा २’ हा चित्रपटाचा दुसरा पार्ट बनवण्यासाठी अगदी कंबर कसून तयारी करत आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी या चित्रपटात मोठ्या कलाकारांची एंट्री होणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक सुकुमार या चित्रपटात सुपरस्टार राम चरण कॅमिओ करणार आहे. या बातमीनंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मात्र, या वृत्ताची औपचारिक माहिती निर्माते किंवा चित्रपटाच्या टीमने दिलेली नाही.
‘पुष्पा २’ या पॅन इंडिया चित्रपटात साऊथ सिनेसृष्टीतील दोन बडे स्टार्स एकत्र चित्रपटाच्या पडद्यावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. राम चरण या वर्षी रिलीज झालेल्या ‘RRR’ चित्रपटाने खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटापासून हे दोन्ही अभिनेते संपूर्ण भारतातील चाहत्यांचे फेव्हरेट स्टार बनले आहेत. आता या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
View this post on Instagram
पुष्पा- द राईजच्या अफाट यशानंतर निर्मात्यांनी आता ‘पुष्पा- द रुल’ ची घोषणा केली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटोही मध्यंतरी शेअर करण्यात आले होते.. चाहत्यांना लवकरच पुष्पा २ पाहायला मिळणार याची आता खात्री पटली आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ‘पुष्पा २’ मध्ये सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात राम चरण काम करणार असेल तर त्याची कॅमिओ भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चित्रपट पुढील वर्षी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.