झी मराठी वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप.. दणक्यात एंट्री करणार ही नवी मालिका.
झी मराठी वाहिनी ही नवनवीन मालिकांसाठी खूप प्रसिद्ध आहे. या वाहिनीवर सतत नव्या मालिका येत असतात. दरम्यान, झी मराठी वाहिनीवर आणखी एक नवी मालिका प्रसारित होण्यासाठी सज्ज झाली आहे पण एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ती मालिका दिसती कोणती नसून तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही आहे. झी मराठी वाहिनीने नुकतीच त्यांच्या सोशल मिडियावरुन नव्या मालिकेची घोषणा केली. नव गडी नवं राज्य मालिकेचा प्रोमो ही रिलीज झाला आहे.
अदिती आणि सिद्धार्थची तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या ६ ऑगस्टला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.
नव गडी नवं राज्य या मालिकेत पल्लवी पाटील आनंदीच्या भूमिकेत दिसणार असून, अनिता दाते रमाच्या भूमिकेत व रमाच्या मुलीच्या भूमिकेत सायशा भोईर दिसणार आहे. अभिनेता कश्यप परुळेकर देखील या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसेल. या मालिकेचा प्रोमो रिलीज झाल्यापासून प्रेक्षक फारच उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
View this post on Instagram
मालिकेच्या या प्रोमोमध्ये सगळ्यांनी आनंदीला पाहिलं आणि या भूमिकेतून देखील प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. आनंदीची भूमिका एक नव्या धाटणीची आहे. त्याबद्दल बोलताना पल्लवी म्हणाली, “मी साकारत असलेल्या आनंदीचं पात्र गावातून आलेली स्वच्छंद स्वभावाची मुलगी आहे. तिच्या आजूबाजूच्या लोकांना ती आवडते आणि आनंद पसरवणारी आनंदी आहे. तिच्या नवऱ्याचा अर्धवट राहिलेला संसार ती कशा पद्धतीने पूर्ण करेल आणि हे करत असताना रमा कशी तिला डिवचणार आहे हे मालिकेत पहायला मिळेल. त्या दोघींचा मजेशीर आमना सामना पाहताना प्रेक्षकांचं खूप मनोरंजन होणार आहे. ही प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी असेल.
रमा आणि आनंदीच्या जुगलबंदीत आनंदी ही एक आई, एक सून, एक पत्नी अशी नाती निभावून रमाची जागा भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे बघणं प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वास पल्लवीने व्यक्त केला आहे. या मालिकेत अनिता दाते रमाची भूमिका सादर करणार असून, आनंदीच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील दिसणार आहे. पल्लवी पाटील या मालिकेतून टीव्ही माध्यमात पदार्पण करतेय. तर रमाच्या मुलीच्या भूमिकेत रंग माझा वेगळा मालिकेत अभिनयाची छाप सोडलेली क्यूट स्टार सायशा भोईर दिसणार आहे.