तिचे दैव बलवत्तर…भीषण अपघातात बचावली टिव्ही इंडस्ट्रीमधील ही लोकप्रिय अभिनेत्री…

0

हल्ली रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. आणि अशाच एका अपघातात मागच्याच काही दिवसात मराठी टिव्ही इंडस्ट्रीमधील सर्वांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री कल्याणी कुरळे हिने जगाचा निरोप घेतला. आणि अशीच एक चिंताजनक बाब हिंदी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हेतल यादव बाबतीत घडली आहे. हेतलचा एक भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे तिचे चाहते काळजीत पडले आहेत.

तर झालं असं की, हेतल रविवारी रात्री शूटिंगवरून घरी परतत होती. रस्त्यावरून जात असताना एका ट्रकने तिच्या कारला जोरदार धडक दिली.मात्र या अपघातात सुदैवाने तिला कोणतीही दुखापत झाली नाही. पण या अपघातानंतर तिला चांगलाच मानसिक धक्का बसला आहे.

तिने सांगितले आहे, मी रात्री ८.४५ च्या सुमारास ती पॅकअप करून फिल्मसिटीहून निघाली होती. अभिनेत्री जेव्हीएलआर हायवेवर पोहोचताच एका ट्रकने तिच्या कारला मागून धडक दिली. या अपघातात तिची कार उड्डाणपुलाच्या काठावर येऊन महामार्गावरून खाली पडणार होती. मात्र तिने कशीतरी हिंमत दाखवून गाडी थांबवली आणि ताबडतोब आपल्या मुलाला फोन करून पोलिसांना कळवण्यास सांगितले.

याविषयी ती म्हणाली, “मुलाला कॉल करून मी त्याला पोलिसांना या अपघाताविषयी माहिती देण्यास सांगितलं. कारण मी काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हते. सुदैवाने मला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र जे काही घडलं, त्यातून मी अजून सावरू शकले नाही”, असं ती पुढे म्हणाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेनंतर अभिनेत्रीला धक्का बसला आहे. या अपघातात अभिनेत्रीला कोणतीही इजा किंवा दुखापत झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. यासाठी तिने देवाचे आभ मानले आहेत. अभिनेत्री म्हणाली की सुदैवाने मला दुखापत झाली नाही. पण तिला मानसिक धक्का आहे.

तिने गेल्या २५ वर्षापासून हिंदी सिने इंडस्ट्री मध्ये जोरदार अभिनयाने नाव कमावले आहे. सोनी सब वरील लोकप्रिय दीर्घकालीन शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये हेतलने ज्वाला चे दमदार पात्र वठवले होते. सध्या ती ‘इमली’मध्ये शिवानी राणाची भूमिका साकारत आहे.

याशिवाय हेतल यादवने इंडस्ट्रीत डान्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. पण नंतर तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले.गेल्या २५ वर्षांपासून ती अभिनय विश्वात आहे. हा खरोखर मोठा अपघात असू शकतो पण नशिबाने ती बचावली. ट्रॉमातून ती लवकर बरी व्हावी अशी आमची इच्छा आहे. असे तिच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. शिवाय तिला लवकरात लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप