इरफान पठाणने टीम इंडियासाठी तयार केला दुसरा बुमराह, 160 किमी प्रतितास वेगाने करतो बॉलिंग..

बुमराह : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. वर्ल्ड कप 2022 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला त्याची अनुपस्थिती स्पष्टपणे जाणवली. जसप्रीत बुमराहच्या पाठीवर काही महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे.

सध्या तो पुनर्वसन करत आहे. दरम्यान, भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने जसप्रीत बुमराहपेक्षा एक मजबूत वेगवान गोलंदाज टीम इंडियासाठी तयार केला आहे. जसप्रीत बुमराह सारखी गोलंदाजी करणारा, त्याच्याप्रमाणे 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो. चला तर जाणून घेऊया या खेळाडूबद्दल

टीम इंडियात जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्यापासून. तेव्हापासून संघाला त्याची खूप आठवण येत आहे. आतापर्यंत टीम इंडियात त्याच्यासारखा गोलंदाज नाही. पण दरम्यान, भारतीय संघाचा माजी अनुभवी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने टीम इंडियाच्या या समस्येवर तोडगा काढला आहे. इरफान पठाण जम्मू-काश्मीरचा कर्णधार आणि मार्गदर्शक असताना त्याला 22 वर्षीय वसीम बशीर सापडला.

जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज वसीम बशीरही जसप्रीत बुमराहप्रमाणे 150 पेक्षा जास्त वेगवान गोलंदाजी करू शकतो. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज उमरान मलिकप्रमाणे वसीम बशीरही जम्मू-काश्मीरकडून खेळतो. त्याच्या वेगवान गोलंदाजीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

2018 मध्ये, जेव्हा भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू इरफान पठाण जम्मू आणि काश्मीरसाठी खेळाडू आणि मार्गदर्शक म्हणून संबंधित होता. त्यानंतर त्याने जम्मू-काश्मीरच्या अनेक खेळाडूंना तयार करण्याचे काम केले होते. इरफान पठाणमुळे उमरान मलिकला टीम इंडियाचा प्रवास करता आला आहे.

नुकताच जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज वसीम बशीरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वसीम बशीर फलंदाजांचे स्टंप उधळताना दिसुन येत होते. वसीम बशीर हा जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागातील आहे. यामुळे त्यांना पहलगाम एक्सप्रेस असेही म्हणतात.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप