पहचान कौन? फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्याने गाजवले आहे बॉलीवूड, कोण आहे ओळखलंत का?
सोशल मीडियावरील बॉलिवूड सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटोज् व्हायरल होत असतात. आणि त्यांचे हे फोटो पाहण्यात चाहत्यांच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग बनलेला असतो. नुकताच, सोशल मीडियावर एका लोकप्रिय कॉमेडियनचा बालपणीचा फोटो व्हायरल होतो आहे. जे पाहून तुम्ही त्याला ओळखू शकत नाही.
सोशल मीडियावर एक खूपच क्यूट फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये दोन लहान मुले दिसत आहेत. ज्यामधे एक लहान मुलगी आणि एक लहान मुलगा दिसतो आहे. तुम्हाला माहित आहे का? फोटोत दिसणारा हा क्युट मुलागा आज मनोरंजनाच्या जगात खूप लोकप्रिय आहे. आज या चिमुकल्याने केवळ टीव्हीच नाही तर बॉलिवूडपासून ओटीटीपर्यंत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
याने कॉमेडीच्या जगात आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. इतकंच नाही तर तर तो उत्कृष्ट डान्सर देखील आहे. कोण आहे हा ओळखलंत का?
फोटोत दिसणारा हा मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूड सुपरस्टार गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक आहे.कृष्णाने ‘क्या कूल हैं हम ३, ‘बोल बच्चन’, ‘तेरी भाभी है पगले’, ‘एंटरटेनमेंट’ आणि ‘२चेहरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.त्याने ‘द कपिल शर्मा शो’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’, ‘कॉमेडी नाइट्स लाइव्ह’, ‘ये मेरा इंडिया’ आणि ‘द ड्रामा कंपनी’ सारख्या शोमध्ये काम केले आहे.तो ‘बू सबकी फतेगी’ या ओटीटी मालिकेतही दिसला आहे.आजकाल कृष्णा त्याची पत्नी कश्मिरा शाहसोबत ‘बिग बॉस १६’ होस्ट करत आहे
View this post on Instagram
दरम्यान, अभिषेक हे नाव इंडस्ट्रीत आधीपासून असल्याने कॉमेडियनने त्याचे नाव बदलून कृष्णा अभिषेक ठेवले. आम्ही तुम्हाला सांगतो की सुरुवातीला कॉमेडियनचे नाव कृष्ण होते, जे एका प्रसिद्ध ज्योतिषाच्या सल्ल्याने बदलून कृष्ण करण्यात आले. दुसरीकडे, कृष्णा अभिषेकने २०१७ मध्ये अभिनेत्री कश्मिरा शाहसोबत लग्न केले आणि त्यांना दोन मुलेही आहेत.
सोबतच फोटो मध्ये कृष्णाच्या शेजारी उभी असलेली मुलगी देखील एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री फोटोमध्ये कृष्णाच्या शेजारी दिसणारी मुलगी त्याची बहीण आरती सिंह आहे.आरती हे छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे.तिने ‘मायका’, ‘गृहस्थी’, ‘थोडा है बस थोडा की जरूरत है’, ‘उतरन’, ‘ससुराल सिमर का’ यांसारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले आहे.ती ‘बिग बॉस १३ मध्ये ती दिसून आली होती.