ब्लॅक सिनेमात लहानपणीची मिशेल साकारणारी ही चिमुकली करणार या चित्रपटातून बॉलीवुड मध्ये दमदार पदार्पण…

0

मोठया पडद्यावर २००५ साली प्रदर्शित झालेला ब्लॅक चित्रपट स्वतः मध्येच प्रेरणादायी होता. या चित्रपटात राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होती. राणीने मिशेलची भूमिका केली होती. हे पात्र आजही रसिकांच्या चांगलेच लक्षात आहे.

आणि याच चित्रपटात राणीच्या लहानपणीची भूमिका साकारणाऱ्या चिमुकल्या आयेशाने आपल्या दमदार अभिनयाने चित्रपट जगतात आपली उपस्थिती दाखवून दिली. ही चिमुकली आगामी काळात बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींमध्ये असेल, अशी चर्चा त्यावेळी झाली होती. आयेशा कपूरने या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड, झी सिने अवॉर्ड आणि आयफा पुरस्कारासह एकूण ७ पुरस्कार जिंकले आहेत.

दरम्यान, चित्रपट जगतापासून लांब असलेली आयेशा बॉलीवूड मध्ये कम बॅक करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Kapur (@ayeshakapur)

इतक्या वर्षांनंतर ती ‘हरी ओम’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.यासाठी तिने अभिनेता अंशुमन झासोबत वर्कशॉपही केले आहे. या प्रकारे तिने बॉलीवूड मध्ये कम बॅक चा प्लॅन केला आहे.

दरम्यान, आयेशाने एका मुलाखतीदरम्यान याचे कारण सांगितले. आयेशा ‘ब्लॅक’च्या चार वर्षानंतर 2009 मध्ये ‘सिकंदर’ या चित्रपटात काश्मिरी मुलीची भूमिका साकारली होती. त्या काळात तिने सांगितले की, तिने आपले संपूर्ण आयुष्य एकांतवासात घालवले आहे, तिला प्रसिद्धीची भीती वाटते. कोणाचेही आपल्याकडे फारसे लक्ष वेधायला नको असे तिला वाटत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayesha Kapur (@ayeshakapur)

जेव्हा आयशाने पदार्पण केले, तेव्हा ती फक्त ११ वर्षांची होती. यामुळे, तिचे पालक तिला खूप संरक्षण देत होते. आयशाने चित्रपटांमध्ये काम करून तिच्या अभ्यासात अडथळा आणावा, अशी दोघांची इच्छा नव्हती. काही काळानंतर तिच्या वडिलांनी तिला अमेरिकेत पाठवले. तेथे त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले.

हरी ओम’बद्दल आयेशा सांगते, ‘मी पुन्हा अभिनयात येण्यासाठी आणि हरी-ओमच्या शूटिंगसाठी उत्सुक आहे. हा एक सुंदर, कौटुंबिक चित्रपट आहे जो प्रत्येकाशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडला जाईल. हरीश सर ज्या साधेपणाने त्यांच्या कथा लिहितात आणि त्यांची पात्रे साकारतात ते मला खूप आवडते. ते खूप वास्तविक आहेत आणि त्यांच्याशी कनेक्ट केले जाऊ शकतात.तसेच या चित्रपटात मी रघुवीर यादव सर आणि सोनी राझदान मॅम सारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले आहे. त्याच्यासोबत काम करणे आणि त्याच फ्रेममध्ये राहणे हा माझ्यासाठी एक रोमांचक शिकण्याचा अनुभव असेल.”

अंशुमन झा, रघुवीर यादव, सोनी राजदान, आयेशा कपूर आणि मनु ऋषी चड्ढा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘हरी-ओम’चे पहिले शेड्युल सप्टेंबरमध्ये भोपाळमध्ये होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप