सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत दिसणारी ही चिमुकली आज आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय अभिनेत्री..
सोशल मीडिया आणि कलाकार यांचं समीकरण अलीकडे लोकप्रिय होत आहे. कलाकारांचे अनेक चाहते त्यांना आता सहज संपर्क साधून आपले प्रेम व्यक्त करू शकतात. त्यांच्या बद्दलचे रोजचे अपडेट घेणे अगदी सोयीस्कर झाले आहे. दरम्यान, सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटोज् व्हायरल होण्याच्या ट्रेंडने चांगलाच जम पकडला आहे. या ट्रेंड मध्ये अनेक सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटोज् व्हायरल होतात आणि ते चाहत्यांना ओळखण्याच चॅलेंज दिलं जातं.
सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीचा एक लहानपणीचा फोटो व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून ठिपक्यांची रांगोळीमध्ये अप्पूची भूमिका साकारणारी ज्ञानदा रामतीर्थकर आहे.
ज्ञानदा रामतीर्थकर ही मराठीचा लोकप्रिय चेहरा आहे. हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे. ज्ञानदा ही मूळची सांगली जिल्ह्यातील विटा शहरातली आहे. पुण्यात कॉलेजमध्ये शिकत असताना ज्ञानदाचे रंगभूमीवर पदार्पण झाले. अभिनयाची आवड जोपासत असतानाच तिने साल २०१७ मध्ये कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘सख्या रे’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
View this post on Instagram
या मराठी मालिकेपासूनच अभिनय क्षेत्रामध्ये तिने आपले पहिले पाऊल ठेवले. कलर्स मराठी वाहिनी नंतर ज्ञानदाला झी युवा वरील जिंदगी नॉट आऊट’ या मालिकेमध्ये स्नेहाची दर्जेदार भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
मराठी मालिकांमध्ये काम करत असताना अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर यांना हिंदी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. साल २०२१ मध्ये स्टार प्लस वाहिनीवरील शादी मुबारक या मालिकेमध्ये उत्तमरित्या भूमिका साकारली. यासोबतच तू इथे जवळी रहा, प्रेमाची आरती या गाण्यातूनही ती प्रेक्षकांसमोर आली होती.‘धुरळा’ या गाजलेल्या चित्रपटातही ज्ञानदा महत्वाची भूमिका साकारताना दिसली. ‘दोस्ती दिल धोका’ हा तेलगू चित्रपटही तिने साकारला आहे.
सध्या ती साकारत असलेल्या अप्पू च्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, ‘मी पहिल्यांदाच अश्या पद्धतीची भूमिका साकारते आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची संपूर्ण टीम. अनेक दिग्गज कलाकार आणि आमचे दिग्दर्शक गिरीश वसईकर यांनी अतिशय छान पद्धतीने मला ही भूमिका पार पाडण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. सेटवरचं सकारात्मक वातावरण काम करण्यासाठी नवी ऊर्जा देतं. अपूर्वा साकारताना तिची एनर्जी कॅरी करणं सुरुवातीला थोडं कठीण गेलं मात्र आता हळूहळू मला सवय होतेय. अशी भावना ज्ञानदाने व्यक्त केली.’