या कारणामुळे अमिताभ बच्चन करत नाहीत मांसाहार…
बॉलीवूड चे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी नुकतेच ८० व्या वयात प्रवेश केलं आहे. पण आजही त्यांच्या तोडीचा अभिनेता मिळणे म्हणजे महाकठीण काम आहे. एक अभिनेता म्हणून त्यांनी आजवर हर प्रकारची भूमिका अगदी चोखपणे बजावली आहे. आणि एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून देखील त्यांचे आयुष्य आदर्शवत आहे. अनेकदा आपण ऐकतो कलाकारांना अनेक शौक असतात. अनेक व्यसन असतात पण बिग बी असे कलाकार आहेत ज्यांना कोणतेही व्यसन नाही. इतकेच काय तर ते मांसाहार देखील करत नाहीत. पण तुम्हाला माहीत आहे का? की बिग बी मांसाहार का करत नाहीत? चला तर जाणून घेऊया ..
सोनी टिव्ही वरील कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाच्या नव्या भागात त्यांनी विद्या रेडकर यांच्यासह मांसाहार या विषयावर गप्पा मारल्या.अनेकदा अमिताभ त्यांच्या खासगी आयुष्यामधले जास्त लोकांना माहीत नसलेले किस्से स्पर्धकांना सांगून मोकळे होतात. असाच एक किस्सा अमिताभ बच्चन यांनी या भागात शेयर केला. दरम्यान या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट प्रसारित झाला. या प्रोमोमध्ये अमिताभ आणि विद्या ‘केबीसी’च्या खेळादरम्यान गप्पा मारत असल्याचे दिसते. तेव्हा बच्चनसाहेबांनी जया यांना मासे खायला फार आवडतात असे सांगितले.
यावेळी अमिताभ यांनी विद्याला ‘तुम्हाला कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो?’ असे विचारले. त्यावर विद्या यांनी ‘मला मांसाहार करायला आवडतो. त्यामध्ये मासे मला फार प्रिय आहेत’ असे सांगत पुढे ‘जया बच्चन यांना सुद्धा मासे आवडतात ना?’ असा प्रतिप्रश्न केला. त्याला अमिताभ यांनी होकार दिला. त्यानंतर त्यांनी ‘तुम्हालाही मासे खायला आवडतात का’ असा सवाल केला. त्यावेळी त्यांनी ‘मी मासे खाणं खूप आधीच बंद केलं आहे. बरेचसे पदार्थ खाणं सोडलं आहे.’ असे विधान केले.
पुढे ते म्हणाले, “मी तारुण्यात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे. वय झाल्यापासून मांसाहार न करण्याचा मी निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी गोड खाणं सोडलं आहे. भात, पान आणि अजून बऱ्याचशा गोष्टी खाणं मी आजकाल टाळतो. जाऊ द्या मी आता पुढे बोलतं नाही.” केबीसी व्यतिरिक्त ते सध्या त्यांच्या ‘ऊंचाई’ या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार बघायला मिळणार आहेत. आणि बऱ्याच वर्षांनंतर डॅनी डेन्झोंग्पा आणि अमिताभ बच्चन मोठ्या पडद्यावर एकत्र दिसून येणार आहेत.