‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील शेफालीचा हा बोल्ड अंदाज पाहून चाहते झाले घायाळ, नऊवारी साडीतील फोटो होत आहेत व्हायरल..

0

‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या टीआरपी मध्ये सगळ्या मालिकांना मागे टाकत टॉपला पोहोचली आहे. यातील मुख्य कलाकार, सहकलाकार विविध कारणांमुळे सतत चर्चेत राहिलेले दिसतात. यावेळी या मालिकेत शेफालीची भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच काजल काटे हिचा नऊवारी साडीतील बोल्ड लुक सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे!

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajal Kate (@kajal_kate_k)

शेफाली म्हणजेच काजल काटे ही तिच्या सोशल मीडिया हँडलवर चांगलीच सक्रिय असून, ती कायमच तिचे वेगवेगळ्या अंदाजातील नवनवीन फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी पोस्ट करत राहते. सध्या माझी तुझी रेशीमगाठ या सिरीयलच्या माध्यमातून काजल महाराष्ट्रातील घराघरात जाऊन पोहोचली आहे. या मालिकेत काजल ती साकारत असलेली शेफालीची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस देखील उतरताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajal Kate (@kajal_kate_k)

मालिकेत ती साकारत असलेल्या आपल्या विनोदी आणि तेवढ्याच मजेशीर स्वभावामुळे काजल प्रेक्षकांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली आहे. कित्येक वेळा फनी व्हिडिओ आणि फोटो शेअर करणाऱ्या काजलने यावेळी प्रचंड सुंदर आणि लक्ष वेधून घेणार फोटोशूट केलेलं आहे! तिने तिच्या इंस्टाग्राम हॅण्डल वर या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा बोल्ड आणि अतिशय ग्लॅमरस असा लुक खुलून आलेला दिसून येत आहे! काजलच्या या नऊवारी लुक वर तिचे चाहते कमेंटचा अक्षरशः पाऊस पाडत आहेत. सोशल मीडियावर हे फोटो तिने पोस्ट केल्यापासून व्हायरल झालेले दिसत आहे. काजलचा हा नवा आणि वेगळा अंदाज तिच्या चाहत्यांना अतिशय आवडला असून अगदी सामान्य माणसांपासून ते सेलिब्रेटी पर्यंत अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत!

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajal Kate (@kajal_kate_k)

काजलच्या या हटके फोटोशूट मध्ये ती निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसलेली दिसत आहे. या साडीवर तिने भरजरी चांदीचे दागिने देखील परिधान केलेले आहेत! तर काजलच्या या खास लूकसाठी मनिषा कोळगे यांनी तिचा हा सुंदर मेकअप केलेला आहे. वेगळी थीम घेऊन कमी प्रकाशात करण्यात आलेल्या या फोटोशूटसाठी काजलने देखील तिच्या वेगळ्या अंदाजात हटके पोझ दिल्या आहेत! याआधी काजल ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतुन झळकताना दिसलेली.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप