मराठमोळा अभिनेता सचिन खेडेकर यांची बायको दिसते खूपच सुंदर, पहा फोटो

0

मित्रहो मराठी कलाविश्वात अनेक कलाकार आहेत, त्यांच्या दर्जेदार भूमिका आणि अभिनय पाहताना एक प्रेक्षक या नात्याने आपण सर्वजण थक्क होऊन जातो. मराठी रंगभूमीवर अनेक चित्रपट, मालिका प्रदर्शित झाला आहेत आणि यातील काही भूमिका मराठमोळा अभिनेता सचिन खेडेकर यांनी सुद्धा साकारल्या आहेत. सचिन यांनी विविधांगी भूमिका पार पाडल्या आहेत, अनेक लोक त्यांचे खूप मोठे चाहते आहेत. कधी एक उत्कृष्ट बाबा म्हणून समोर आले, तर कधी एक उत्तम प्रियकर म्हणून समोर आले तर कधी चांगला मित्र, कधी खचलेल्या व्यक्तीचा आधार म्हणून तर कधी चक्क खलनायक म्हणून त्यांनी पडद्यावर एन्ट्री घेतली आहे.

सचिन यांच्या भूमिकांना आजवर प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे, पडद्यावर जसे ते लोकप्रिय आहेत तसेच पडद्याआड सुद्धा त्यांची क्रेझ चाहत्यांच्या गर्दीत दिवसेंदिवस वाढतच असते. सचिन तर प्रसिद्ध आहेतच सोबतच त्यांच्या घरची मंडळी सुद्धा खुप प्रसिद्ध आहेत. आज आपण त्यांच्या फॅमिली बद्दल खास माहिती जाणून घेणार आहोत. सचिन यांनी जलपा यांच्या सोबत १९९३ ला लग्न केले होते. जलपा दिसायला खूप सुंदर आहेत, कलाविश्वापासून त्या दूर असून व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सचिन व जलपा यांची जोडी खुप छान आहे. सोशल मीडियावर दोघांचे फोटो नेहमीच पाहायला मिळतात.

सचिन आणि जलपा या दांपत्याला सोहम आणि अर्चित या नावाची मुले आहेत. मोठा मुलगा सोहम हा कॅलिफोर्निया येथील लॉस एंजलीस मध्ये राहतो. कॅलिफोर्निया येथील कॉलेजमध्ये त्याने कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे, सध्या तो मेटा या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो आहे. सोहम सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो, सचिन यांचा लहान मुलगा अर्चित याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. सोहम आणि अर्चित दोघेही खूप हुशार आहेत, आई वडिलांचे नाव त्यांनी मोठे केले असून नेहमीच सचिन आपल्या मुलांचे कौतुक करत असतात.

सचिन यांनी आजवर “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय”, “मुरांबा”,” शूटर”,”नेताजी सुभाषचंद्र बोस” , “काकस्पर्ष” , “हलाल” , “बापजन्म”,”आजचा दिवस माझा” ,”लाठी” , “लालबाग परळ” ,” कोकणस्थ”, “चिमणी पाखरं” ,” तेरे नाम” ,”सिंघम”, “नागरिक”, “फक्त लढ म्हणा”, “आयना का बायना” , “रुस्तम “, “ताऱ्यांची बेट”, “पिठा”, “अंतिम” यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी आकाशात गवसणी घातली आहे. प्रत्येक भूमिका अतरंगी वाटते. त्यामुळे चाहते मंडळी त्यांच्यावर विशेष प्रसन्न असतात.

१९९० साली त्यांनी “जिवा सखा” या मराठी चित्रपटातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अजिबात मागे वळून पाहिलं नाही, नवनवीन भूमिका साकारत प्रत्येक पायरी ते चढतच गेले. त्यांच्या यशाची उंची आज कितीतरी मोठी आहे, त्यांना नेहमी असेच यश, लोकप्रियता मिळत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप