गणपती बाप्पा मोरया म्हणत या वर्षी अगदी उत्साहाने , थाटामाटात आणि ढोल ताशांच्या गजरात बाप्पाच आगमन झालं आहे. पण आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ ही आली आहे. गेल्या दोन वर्षांची कसर भरून काढत अनेकांनी आनंदाने बाप्पाला घरी आणले. आपल्या लाडक्या कलाकारांनी देखील बाप्पाच जोशात स्वागत केलं. आणि पूर्ण भक्तिभावाने बाप्पाच विसर्जन देखील केलं. आता जाणून घ्या कोण कोण आपल्या बाप्पाचे विसर्जन कसं केलं?
आदेश बांदेकर
भाऊजींच्या घरच्या गणपतीचा व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हायरलही झाला आहे. त्यात मूर्ती तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून एका बाॅक्समध्ये बंद होते. ती बंद होण्याआधी एकदा वर आणून मग पुन्हा आत जाते. जणू बाप्पा निरोप घेतोय, असं उपस्थितांना वाटत राहतं. हे अगदी पर्यावरण पूरक विसर्जन आहे. चाहत्यांना ते खूप आवडलं आहे.
श्रेया बुगडे
अभिनेत्री श्रेया बुगडेने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे. तर निरोप देताना ती भावुक झाली होती. विसर्जनाचे फोटोज् आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत तिने लिहिल की, तुला निरोप देताना माझं हृदय किती दुखतंय.माझी इच्छा आहे की मी तुला कधीही जाऊ देऊ नये!, लवकर परत ये.
View this post on Instagram
सिद्धार्थ चांदेकर
क्लासमेट, झिम्मा फेम अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या बाप्पाचं सुद्धा विसर्जन झालं आहे. यावर्षी त्यांनी नव्या घरात गणेशाची स्थापना केली होती. मितालीने पोस्ट शेअर करत लिहिलं की, निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी. चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी! पुढल्या वर्षी लवकर या!
View this post on Instagram
भूषण प्रधान
अभिनेता भूषण प्रधानच्या बाप्पाचं सुद्धा विसर्जन झालं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्याने घरच्या घरीच इकोफ्रेंडली विसर्जन केलं आहे. याचे फोटोज् शेयर करून त्याने बाप्पाला वंदन केलं.
View this post on Instagram
मायरा वायकुळ
झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीम गाठ मालिकेतील परी अर्थात बालकलाकार मायरा वायकुळच्या घरच्या बाप्पाचं सुद्धा विसर्जन झालं आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर याचे फोटोज् शेयर केले आहेत.
View this post on Instagram
अभिज्ञा भावे
अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन झालं आहे. निरोप देताना अभिज्ञा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तिने फोटोसोबत पोस्ट लिहिली आहे, “हे वर्ष खऱ्या अर्थाने खास होतं, माझा विघ्नहर्ता सगळे विघ्न त्याच्याबरोबर घेऊन गेला. हा कठीण काळ मागे टाकून पुढच्या वर्षी अधिक जोमाने तुझी सेवा करायची वाट बघू!!! बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या! ”
View this post on Instagram