अशी झाली सुरू अक्षया आणि हार्दिकची लव्हस्टोरी…आधी ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात

0

अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर आज २ डिसेंबर २०२२ विवाहबंधनात अडकणार आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ते दोघेही घराघरात पोहोचले. या मालिकेत हार्दिक जोशीने राणादा ही भूमिका साकारली होती. तर अक्षया देवधर ही या मालिकेत पाठकबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळाली. राणादा आणि पाठकबाई ही जोडी छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरली होती. रिल लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? हार्दिक आणि अक्षयाची लव्ह स्टोरी हार्दिकच्या आईमुळे पुढे गेली.

हार्दिकनं बस बाई बसमध्ये दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला होता, ‘मालिकेदरम्यान आमची मैत्री झाली. लग्नाचा विचार माझ्या डोक्यात नव्हता’.माझी आई अक्षयला नेहमी विचारायची की मला तू आवडतेस तुला काय वाटतं? मला यातलं काही माहिती नव्हतं’.आमची मालिका संपली आणि आईनं लग्नासाठी तगादा धरला. दुसरी मालिका नाहीये.

सध्या घरी आहेस तर लग्नाचा विचार कर. वय निघून जातंय, असं ती सारखी मला म्हणायची’.आपल्या दोघांच लग्न व्हावं अशी माझ्या आईची इच्छा आहे’, असं मी अक्षयाला म्हणालो. त्यावर ती, ‘ठिक आहे तू एकदा माझ्या घरी येऊन बोल’, असं म्हणाली.’२० एप्रिलला मला सगळं सांगितलं दहा दिवसांमध्ये आमचा साखरपुडा झाला. आईच्या इच्छेनुसार, ३ मेला आईच्या वाढदिवशी आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आम्ही साखरपुडा केला’.हार्दीक असंही म्हणाला की, ‘आई बोलली नसती तर मी कधीच अक्षयाला लग्नासाठी विचारलं नसतं’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

दरम्यान, अक्षया हार्दिक जोशी आधी अभिनेता सुयश टिळकबरोबर रिलेशनमध्ये होती. मात्र दोघांनी नात्याला पूर्णविराम देत आता नवीन आयुष्याची सुरूवात केली आहे.

सध्या अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक यांचा लग्नसोहळा दिमाखात पार पडत आहे. तर काल यांचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. दोघांनीही त्यांचं संगीत खूप एन्जॉय केलेलं पहायला मिळतंय. संगीत सोहळ्यात अक्षयाने ऑफ शोल्ड गाऊन घातला असून हार्दिकने जॅकेट-सूट घातला आहे. दोघेही या कॉस्ट्यूममध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AMOL LAXMAN KAGNE (@amol_kagne_official)

तर मेहेंदी सोहळ्यात अक्षया फारच सुंदर दिसत आहे. कलरफुल लेहेंगा परिधान करून तिने फोटोशूट केलं आहे.हार्दीक आणि अक्षया हे पुण्याच्या प्रसिद्ध ढेपे वाड्यात शाही विवाह सोहळा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्याही लग्नाच्या नवनवीन अपडेट समोर येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप