राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान मिळवतात इतके पैसे, जाणून घ्या त्यांचा पगार किती असतो…

मित्रहो देशाचा विकास घडवायचा असेल तर देशातील नागरिक आणि सरकार सर्वजण जबाबदार असायला हवेत. नियम आणि कायदे यावर शासन चालू असते, सरकार हे वेगवेगळे मंत्री, पद यावर आधारित असते. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान हे तिघेजण मुख्य असतात. यांच्या निर्णयावर सगळे नियम लागू होत असतात. या तीनही पदांचा दर्जा समान असतो, प्रत्येक जण आपापल्या भूमिकेत योग्यच असतो. तसेच त्यांना मिळणारे वेतन त्यांच्या त्यांच्या पदानुसार आकारून दिले जाते. आज आपण या लेखातून या तीनही पदांचे वेतन, त्यांच्या सुविधा बद्दल खास माहिती जाणून घेऊया.

 

भारताचे राष्ट्रपती :- भारताचे राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात, त्यांचा मानसन्मान सर्वांपेक्षा अधिक असतो आणि त्यामुळेच त्यांना मिळणाऱ्या सुविधा सुद्धा तितक्याच दर्जेदार असतात. राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र दलाचे कमांडर-इन-चीफ देखील असतात. दर महिन्याला राष्ट्रपतींना जवळपास पाच लाख इतके वेतन असते. या वेतनावर कोणत्याही प्रकारचा कर लागू केलेला नसतो. भारताचे राष्ट्रपती हे राष्ट्रपती भवनात राहतात. सोबतच त्यांना हव्या असलेल्या सर्व सुविधा मोफत दिल्या जातात.

भारताचे उपराष्ट्रपती :- मित्रहो भारताचे राष्ट्रपती, त्यांचे वेतन व सुविधा याबद्दल आपण जाणून घेतलेच आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे देखील अध्यक्ष असतात. सरकार तर राष्ट्रपती चालवतात, पण त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे काम उपराष्ट्रपती करतात. सर्व महत्वाच्या जबाबदारी त्यावेळी उपराष्ट्रपती यांच्यावर येतात. त्यामुळे त्यांना वेतन आणि सुविधा सुद्धा त्याच प्रकारच्या असतात. भारतात उपराष्ट्रपतींना सभापती म्हणून दरमहा चार लाख रुपये इतके वेतन दिले जाते. सोबतच त्यांना मोफत बंगला, वैद्यकीय सुविधा, वेगवेगळे भत्ते दिले जातात.

पंतप्रधान :- पंतप्रधान हे भारतातील एक जबाबदार नागरिक असतात, त्यांच्या निर्णयाचे संपूर्ण देशभर आदराने पालन केले जाते. २०१२ पासून पंतप्रधानांना दरमहा सुमारे एक लाख सत्तर हजार रुपये वेतन दिले जात आहे. त्यांचे मूळ वेतन फक्त पन्नास हजार इतकेच असते, पण भत्ता ३००० रुपये, खासदार भत्ता ४५ हजार रुपये, दैनंदिन २००० रुपये असे सर्व मिळून त्यांना एकूण १,६०,००० हजार रुपये देण्यात येतात. सोबतच त्यांनाही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींना जसे बंगला, वैद्यकीय सुविधा दिल्या जातात अगदी तशाच सुविधा दिल्या जातात.

मित्रहो हे तिन्ही लोक आपल्या देशासाठी खूप गरजेचे असतात, त्यांचे निर्णय, त्यांची मते या देशासाठी खूप महत्वाचे असतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेता येणे आवश्यक असते, म्हणून तर ही पदे निर्माण केली असून या पदावर कार्यरत असणारे लोक देखील तितकेच हुशार आणि जबाबदारी समजणारे असावे लागतात. अन्यथा देश विस्कळीत होतो व कायद्याचे, नियमांचे उल्लंघन होत राहते. मात्र भारतातील आजवर या तीनही पदांवर जे जे लोक विराजमान झाले त्या सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या योग्य पार पाडल्या आहेत. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Comment

Close Visit uttamsheti