तिसऱ्यांदा आई होण्यासाठी करीनाने केले स्वतःला अशाप्रकारे तयार..म्हणाली, मी सैफच्या मुलाला माझ्या..
बॉलीवुड मध्ये स्टार्स बद्दलच्या बातम्या कशा वाऱ्यानं पसरतात हे समीकरण फार जुने आहे. अनेकांची फेवरेट बॉलीवुडची बेबो आणि नवाब सैफ अली खान या कपलची चर्चा वारंवार सोशल मीडियावर होत असते. त्यांच्या क्यूट अशा मुलांचीही चर्चा नेहमीच होताना दिसून येते. दरम्यान, सोशल मीडियावर करीना तिसऱ्यांदा आई होणार असल्याचा अफवांना उधाण आले होते. पण त्यावर करीनाने लगेचच इंस्टाग्राम पोस्ट लिहीत अस काही नसल्याचं स्पष्ट केले.
दरम्यान, सैफ अली खान ने तिने आई होण्याचा निर्णय घेताना कशाप्रकारे स्वतःला तयार केले याचा खुलासा केला.
त्याने करीना कपूर खानच्या प्रेग्नेंसी बाइबिल: द अल्टीमेट मैनुअल फॉर मॉम्स-टू-बी मध्ये लिहिले होते की, करीनाने आई बनण्यासाठी सरोगेसीचा विचार केला होता. छोट्या नवाबने देखील खुलासा केला कि त्याने जेव्हा करीनाला डेट करायला सुरुवात केली होती तेव्हा तिची साईज झिरो होती.
सैफ अली खानने लिहिले कि, इंडस्ट्रीमध्ये एका अभिनेत्रीवर खूप दबाव असतो. तुम्ही कसे दिसत यावर खूप काही अवलंबून असते. जेव्हा आमचे नाते सुरु केले होते तेव्हा ती झिरो साईजमध्ये होती. किड्स स्टोरमधून खरेदी करायची कारण फक्त तिथेच तिच्या फिटिंगचे कपडे मिळत होते. तिचे करियरदेखील खूप चांगले सुरु होते. सैफने हा देखील खुलासा केला कि करीनाने सरोगेसीपासून वाचण्यासाठी आणि नॅचरल पद्धतीने आई बनण्यास स्वतःला तयार करण्यासाठी खूप वेळ घेतला होता.
पुस्तकामध्ये लिहिले आहे कि, प्रेग्नंसी बॉडीवर खूप परिणाम करते. तुम्हाला परत शेपमध्ये येण्यासाठी खूप वेळ लागतो. करीना यामुळे खूपच चिंतेत होती. जेव्हा आम्ही पहिल्यांदा मुलाबद्दल विचार केला तेव्हा तिने सरोगेटसाठी विचार केला होता. पण तिला नंतर जाणीव झाली कि लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीला १००% देण्याची गरज असते.
दुसऱ्या मुलाची प्लानिंग करताना करीनाने सेरोगेसीबद्दल सैफ अली खानसोबत बातचीत केली होती. एका मुलाखती दरम्यान करीना कपूरने सैफच्या प्रतिक्रियेबद्दल बातचीत केली होती. करीना म्हणाली होती कि, माझ्या मनामध्ये होते कि सेरोगेसी केली पाहिजे. सैफने रिअॅक्ट करताना म्हंटले कि जर आपल्याला मुले होत असतील तर स्वतः प्रयत्न का करू नये ?
तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करिना लवकरच आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात दिसणार आहे. हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. त्यात मोना सिंगसह इतर स्टार्सही आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.