मराठीतील दिग्गज अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या जावया बद्दलची ‘ही’ माहिती वाचलीत का? आज बनला आहे सेलिब्रिटी शेफ!!!

0

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी मधील श्रेष्ठ दिवंगत अभिनेते म्हणजे सदाशिव अमरापूरकर! सदाशिव अमरापूरकर यांनी आतापर्यंत कित्येक चित्रपटांमध्ये रंगवलेली खलनायकाची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. सडक या सिनेमात त्यांनी निभावलेली महाराणीची भूमिका देखील प्रचंड गाजली होती! या भूमिकेसाठी त्यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव देखील झालेला. आपल्या विनोदाच्या कॉमिक टाइमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे सदाशिव अमरापुरकर यांनी प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही! परंतु असे असले तरी सदाशिव अमरापुरकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती कुणालाच नाही, परंतु याच सदाशिव अमरापूरकर यांचे जावई देवव्रत जातेगावकर हे प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ बनले आहेत!

सदाशिव अमरापुरकर आणि सुनंदा अमरापुरकर यांना एकूण तीन मुली. केतकी, सायली आणि रिमा यापैकी केतकी हिचा पती देवव्रत जातेगावकर हे सेलिब्रिटी शेफ आहेत.

झी मराठी वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमामध्ये शेफ देवव्रत जातेगावकर झळकले होते. या शोच्या माध्यमातून रुचकर पदार्थ बनवणे आणि ते तेवढ्याच आकर्षकतेने सजवणे ही त्यांची खासियत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. म्हणूनच आज मराठी सृष्टीतील सेलिब्रिटी शेफअशी प्रसिद्धी त्यांनी कमावली आहे! २०१२ रोजी जर्मनी येथे झालेल्या कलनरी ऑलिंपिक या स्पर्धेमध्ये देखील देवव्रत यांनी भारताला रौप्य पदक मिळवून देत गौरव प्राप्त केला होता. देवव्रत प्रसिद्ध कथा लेखक आणि कादंबरीकार आनंद जातेगावकर यांचे ते चिरंजीव आहेत.

देववृत यांचे सासरे म्हणजेच सदाशिव अमरापूरकर यांचे २०१४ रोजी किडनीच्या विकाराने निधन झाले. त्यावेळी मराठीसह बॉलीवूड सिनेसृष्टीला देखील मोठा धक्का बसलेला. सदाशिवरावांनी अभिनयाच्या त्यांच्या या प्रवासात सामाजिक बांधिलकीचे भान जप्त विविध सामाजिक संस्थांची जोडले गेले होते. त्यावेळी त्यांनी मेघा पाटकर यांच्यासोबत नर्मदा आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा वेगवेगळ्या सामाजिक संस्थासोबत कार्य केले होते.
सदाशिव अमरापूरकर यांच्या नावाने ट्रस्ट देखील स्थापन करण्यात आला आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना आजच्या काळातही मदतीचा हात देण्यात येतो!

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप