मराठमोळा कलाकार भाऊ कदम यांच्या मुलीचं हे हटके फोटोशूट पाहिलत का? ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो होत आहेत व्हायरल!

0

‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊ कदम महाराष्ट्रातील घराघरात जाऊन पोहोचले! त्यांचे विनोदाचे टाइमिंग, हजरजबाबीपणा यावर महाराष्ट्रातील प्रेक्षक त्यांच्यावर जाम फिदा आहेत! टेलिव्हिजन असो अथवा मोठा पडदा तेथील कलाकारांच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्य विषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते कायमच उत्सुक राहतात. परंतु या लेखातून आम्ही भाऊ कदम यांच्या विषयी नव्हे तर त्यांच्या मोठ्या लेकी विषयी माहिती तुम्हाला यातून देणार आहोत, यासाठी शेवटपर्यंत लेख जरूर वाचत राहा!

भाऊ कदम यांच्या लाडक्या मुलीचे नाव आहे मृण्मयी कदम. काही काळापूर्वी मृण्मयीचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता आणि ती पहिल्यांदाच त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आली होती.

यावेळी मृण्मयीने तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक हटके फोटोशूट तिच्या चाहत्यांसोबत शेअर केल आहे. भाऊ कदम आणि त्यांची ही मोठी लेक मृण्मयी त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून कायमच ऍक्टिव्ह असलेले दिसतात. सध्या मृण्मयी सुद्धा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत स्वतंत्रपणे आपली नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यांच्याप्रमाणे तिला सुद्धा अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. तिचे तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे. तसेच मृण्मयी शिवाय भाऊ कदम यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. संचिता, समृद्धी व आराध्य ही त्यांची नावं आहेत. मृण्मयीच्या नामकरणावरून त्यांनी एक किस्सा शेअर केला होता. मृण्मयीचे नामकरण एका मालिकेवरून करण्यात आले होते. त्यावेळी ‘मृण्मयी’ नावाची एक मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेच्या नावावरूनच तिच्या आजीने आपल्या नातीचे नामकरण मृण्मयी असे ठेवले.

 

View this post on Instagram

 

A post shared by •Mrunmayee kadam•🦄 (@manu_kadam_)

मृण्मयी तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून देखील प्रचंड ऍक्टिव्ह असते. मृण्मयीने आपल्या शिक्षण के जी जोशी आणि एन जी बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्समधून पूर्ण केलं आहे. तिच स्वतःच यूट्यूब चैनल देखील आहे आणि त्यावर तिने हजारो सबस्क्राईबर देखील मिळवले आहेत.

मृण्मयी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर वेस्टर्न लुक पासून ते पारंपारिक पोशाखापर्यंतचे विविध फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत राहते! त्यामुळे या चमचमत्या कलाविश्वात येऊन ती किती यशस्वी ठरते आणि प्रसिद्ध होते हे पाहणे देखील तिच्या चाहत्यांसाठी उत्कंठावर्धक ठरणार आहे!

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप