हा प्रसिद्ध अभिनेता आहे शेफालीचा रिअल लाईफ मेव्हणा, साकारतोय जबरदस्त खलनायकाची भूमिका..
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील अवखळ आणि निरागस पात्र म्हणजे नेहाची मैत्रिण म्हणजे शैफाली. मालिकेत जिवंत पणा टिकवण्याचे काम शेफाली आपल्या निरागस अभिनयाने करते. शेफाली टेलिव्हिजनवर ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? शेफाली ची बहिण आणि नवरा देखील टिव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कलाकार आहेत. कोण आहे तिचा कलाकार मेव्हणा जाणून घ्या.
कलाकार म्हणजे अभिनेत्री काजल काते आणि अभिनेता ऋषिकेश शेलार.ऋषिकेश हा काजलचा मेव्हणा आहे. म्हणजेच ऋषिकेश काजलच्या बहिणीचा नवरा आहे.ऋषिकेश आणि त्याची पत्नी स्नेहा एकमेकांचे जीवनसाथी आहे. ऋषिकेश नेहमीच स्नेहाबरोबरचे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असतो.स्नेहा ही काजलची सख्खी बहिण आहे.सध्या दोन्ही बहिणी आपल्या साथीदाराबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
दरम्यान ट्रिपचे फोटो काजल आणि ऋषिकेश यां आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेत. या फोटोज् मुळे पहिल्यांदाच या दोघांमध्ये असलेलं नातं चाहत्यांसमोर आलं आहे.काजल सध्या माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत शेफालीची भूमिका साकारत आहे. तर ऋषिकेश सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत दौलतची नकारात्मक भूमिका आहे उत्कृष्टरित्या साकारत आहे. शेफाली आणि दौलतची जोडी एकत्र पाहून चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलं आहे.
View this post on Instagram
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभी आणि लतिका सोबतच दौलतही तितकाच प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या रांगडा अंदाज, त्याचा हटके लुक, त्याचे तेवढेच हटके संवाद सगळेच हिट झाले आहेत. हृषिकेश हा मूळचा सांगलीचा आहे. सांगलीतच त्याचा जन्म आणि शिक्षण झाले.
ऋषिकेशची बायको ही सुद्धा अभिनेत्री आहे. तिने अनेक नाटकांमधे काम केले आहे. ‘लक्ष्मी सदैव मंगलंम’ या मालिकेतून ऋषिकेशने आपल्या करियरची सुरुवात केली होती. या मालिकेत त्याच्यासोबत समृध्दी केळकर दिसली होती. त्यानंतर त्याने ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेत काम केले आहे. त्याचबरोबर त्याने ‘शांतेचे कार्ट चालू आहे’ या नाटकांतही काम केले आहे.
शेफालीची बहीण आणि ऋषिकेशची बायको स्नेहा सध्या ‘एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ या हिंदी मालिकेमध्ये जिजाबाईंची भूमिका उत्तमरीत्या साकारते आहे. याव्यतिरिक्त स्वराज्यजननी जिजामाता, प्रेमा तुझा रंग कसा, बाय बाय बायको, गर्ल्स हॉस्टेल, दुनियादारी फिल्मी इश्टाईल अशा अनेक मालिका, नाटकांमधून तिने अभिनय केला. कलाकारांचे हे त्रिकुट टिव्ही इंडस्ट्रीमध्ये चांगली कामगिरी बजावत आहे.