प्रार्थना बेहरे पासून अंकिता लोखंडे पर्यंत.. सुनेच्या रूपात प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्री डेब्यूच्या वेळी दिसत होत्या अश्या..

0

छोटया पडद्यावरील चाहत्यांचे मुख्य आकर्षण असत. ते म्हणजे मालिका आणि त्या मालिकेतील लाडकी सून. दिसायला एकदम साधी पण वेळ आली की आपल्या कुटुंबाला अनेक संकटातून वाचवणारी सून. आजवर अनेक मालिकांतून सूनानी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की त्यांच्या या सुरुवातीच्या काळात या सूना कशा दिसायच्या? चला तर जाणून घ्या आजच्या या लेखात..

प्रार्थना बेहेरे: सध्या झी मराठी वाहिनीवर गाजत असेल्या तुझी माझी रेशीमगाठमधील नेहा म्हणजेच प्रार्थना बेहरेने प्रसिद्ध मालिका पवित्रा रिश्तामधून सुरुवात केली होती. यावेळी ती अगदी साधी दिसायची. पण आता तिचे लूक्स पाहून चाहते रोज घायाळ होतात.

अंकिता लोखंडे: झी टीव्हीवरील सर्वात गाजलेली आणि आजही सर्वांच्या लक्षात असलेली मालिका पवित्र रुस्था मधील अर्चना म्हणजेच आपली लाडकी अंकिता लोखंडे सुरुवातीच्या काळात अत्यंत साध्या स्टाईल मध्ये वावरत असायची. पण आता तिचा बोल्ड लूक चाहत्यांची विकेट घेतल्यावाचून राहत नाही.

प्राजक्ता माळी: झी मराठी वाहिनीवर जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घरोघरी पोहचलेली प्राजक्ता माळी सुरुवातीच्या काळात सालस अशा रुपात सर्वांच्या भेटीला आली होती.

प्रिया बापट: आणि काय हवं मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या प्रिया बापटने चित्रपटातून बालकलाकार म्हणूनही काम केले होते.

मधुराणी प्रभुलकर: स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकर हिने नवरा माझा नवसाचा मध्ये साकारलेली व्ही जे ची अनोखी भूमिका साकारत चाहत्यांना चाट पाडले होते.

रुपाली गांगुली: स्टार प्लस वाहिनीवरील अनुपमा मालिकेतील रुपाली गांगुली हिने सुकन्या या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले होते.

मृण्मयी देशपांडे: अग्निहोत्र मालिकेतून मृण्मयी देशपांडेने छोटया पडद्यावर पदार्पण केले होते, तिची कुंकू मालिकेतील भूमिकाही गाजली होती. आता तिचा बोल्ड अंदाज लोकांना घायाळ करतो आहे.

हृता दुर्गुळे: महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृता दुर्गुळेने दुर्वा या भूमिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर फुलपाखरू हि मालिकाही हृतामुळे गाजली होती.

तेजश्री प्रधान: होणार सून मी या घरची मधून घरोघरी पोहोचलेली तेजश्री प्रधान जान्हवी साकारण्याआधीच चित्रपटांमधूनही दिसून आली होती.

मृणाल दुसानिस: मृणाल दुसानिस हिने माझिया प्रियाला प्रीत कळेना मालिकेतून पदार्पण केले होते, यानंतर झी मराठी वरील तू तिथे मी या मालिकेतून तिची मंजिरी भूमिका चांगलीच गाजली होती.

रूबीना दिलैक: सर्वाची लाडकी छोटी बहु सध्या झलक दिखला जा शोमुळे चांगलीच चर्चेत असते.

अक्षया देवधर: अक्षयाने टीव्हीवर तुझ्यात जीव रंगला मध्ये पाठक बाई म्हणून प्रेक्षकांना वेडे केले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप