मराठी सिनेसृष्टीतील गायब झालेली ही अभिनेत्री आता अमेरिकेत झाली स्थायिक.. म्हणाली “..आयुष्य किती बदललंय.. “

0

आजवर आपण पाहिले आहे की, अनेक कलाकारांनी सिनेइंडस्ट्रीतून अचानक पणे एक्झिट घेतली आहे. जे कधी काळी प्रसिद्धीच्या झोतात झळकत होते. असेच काहीसे छोट्या पडद्यावर देखील होत असते. छोटया पडद्यावरील लोकप्रिय कलाकारांनी अचानकपणे काम बंद केले आहे. यापैकी एक अभिनेत्री म्हणजे सर्वांची लाडकी मृणाल दुसानिस.

आपल्या सर्वांना हे नाव खूप प्रचलित आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्थान मिळवले. पण सध्या ती सिनेइंडस्ट्रीपासून फार दुरावली आहे. तस पाहता मृणाल दुसानीस ही मूळची नाशिकची रहिवासी आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट मालिका केल्या आहेत.मृणालने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतही काम केले. ज्यामुळे तिला टिव्ही इंडस्ट्री मध्ये ओळखले जाऊ लागले. त्यानंतर मृणालने ‘तू तिथे मी’ या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेत तिने साकारलेली मंजिरीची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेमध्ये चिन्मय मांडलेकर हा देखील दिसला होता.त्यानंतर. अस्सं सासर सुरेख बाई तसेच मन हे बावरे या मालिकेतही ती झळकली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Dusanis (@mrunaldusanis)

दरम्यान, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ मालिका अर्ध्यात सोडून तिने सिनेइंडस्ट्रीतून काही कालावधीसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती बराच मोठा कालावधी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून गायब झाली होती. मात्र मृणाल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ज्यावर चाहते भरभरून प्रेम व्यक्त करतात. आता मृणाल चा अनोखा अंदाज पहायला मिळतो. आपला मराठी साज सोडून तिने विदेशी पेहराव आपलासा केला आहे. त्यामुळे तिचा नवा लूक पहायला मिळतो आहे.

तिच्या अचानक गायब होण्याचे एक कारण म्हणजे तिचे लग्न.. मृणाल दुसानीस २५ फेब्रुवारी २०१६ रोजी नीरज मोरेसोबत लग्नबंधनात अडकली. नीरज मोरे हा अमेरिकेमध्ये स्थायिक आहे आणि तो अमेरिकेमध्ये उत्तम सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. मृणाल देखील त्याच्यासोबतच तिथे राहते आहे.मृणाल दुसानिस आणि नीरज मोरेला एक मुलगी असून त्यांचा फॅमिली फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात..

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Dusanis (@mrunaldusanis)

दरम्यान, लेकीच्या येण्यानं मृणालच्या आयुष्यात अनेक बदल आले. आणि तिने तिचा आयुष्यात आलेले बदल इंस्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट करून कळवले होते. या पोस्टमध्ये तिने आपल्या पतीचा आणि लेकीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मृणालचा पती त्यांच्या लेकीला खेळवताना दिसून येत आहे. ‘आणि शेवटी नीरज बोलता झाला…. नाहीतर घरात मी नाही बोलले तर कुणीच बोलत नाही.. भयंकर शांतता… पण आता सगळं बदलतंय …” या पोस्ट वरून कळतय की ती आपल्या परिवारासोबत किती खुश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप