अभिनेत्याने सुरू केलं दुकान, संधी मिळत नाही म्हणून न लाजता सुरू केलं काम
मित्रहो या अभिनय क्षेत्रात प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं सगळं घडत राहील अस नसत. पावला पावलावर उत्कृष्ट कलाकार तग धरून आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या भूमिकेचे, अभिनयाचे इथे विशेष कौतुक होत असते. जरी प्रत्येकजण निराळा असला तरीही ही पडद्यावर झळकण्याची स्पर्धा मात्र एकच आहे आणि या स्पर्धेत सर्वानाच संधी मिळत जाते अस अजिबात नसतं. त्यामुळे कधी कधी ज्या कलाकारांना संधी मिळते ते आपली बाजू भक्कम बनवण्यासाठी प्रयत्न करू लागतात. ज्यांना संधी मिळत नाही ते देखील प्रयत्न करू लागतात. पण अलीकडेच एक अभिनेता कलाविश्वात संधी मिळत नाही म्हणून दुकान चालवत आहे.
हा अभिनेता म्हणजे “मुलगी झाली हो” फेम किरण माने. किरण सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांच्या अनेक पोस्ट शेअर केल्या जातात, यावर लाईक्स आणि कमेंट्सचा नेहमीच वर्षाव होत असतो. किरण यांनी फेसबुकच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. किरण आणि कवी गीतकार किशोर कदम यांची मैत्री फार जुनी आहे. त्यांच्या मैत्रीचे किस्से वरचेवर कानावर पडत असतातच. अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर या दोघांचे पाहायला मिळतात.दोघांचीही लाईफ स्टोरी खुप आकर्षक आणि काही तरी शिकायला मिळेल अशीच आहे.
किरण ही पोस्ट शेअर करत खाली लिहतात “एक काळ असा होता जेव्हा मी अभिनय सोडून साताऱ्याला परतलो. दुकान सुरू केलं,आपण नाटक करू शकत नाही या विचाराने खूप त्रास व्हायचा. एकदा गावात नाटकाची गाडी बघून तर ढसाढसा रडलो. दुसऱ्या दिवशी तुझा फोन आला आणि एका सिनेमात तू मला हवा आहेस अस म्हणत माझी आठवण ठेवलीस. तू मला साताऱ्यात न्यायला आलास, तो सिनेमा आला नाही पण तुझ्याशी मी जोडला गेलो. आयुष्यातील अनेक चढउतार आपण पाहिले आहेत.”
अशी भावुक पोस्ट किरण माने यांनी लिहली आहे, त्यांच्या पोस्टला पाहून अनेकजण भावुक झाले आहेत. नेटकऱ्यांनी ही पोस्ट वाचून यावर आपणही भावुक कमेंट्स केल्या आहेत. मित्रहो आठवणी नेहमीच आपणाला चार पावले मागे ओढून परिस्थितीची जाणीव राखण्यास शिकवत असतात. म्हणून तर कोणत्या स्थितीतून आपण इथवर आलो आहोत हे आपण काहीच विसरत नाही. जेव्हा आपण आठवणी जपतो तेव्हाच वर्तमानाच्या परिस्थितीची आपल्याला जाण राहते. एक माणूस म्हणून आपण त्यावेळी खंबीरपणे पाऊल उचलतो आणि आयुष्यातील वळणे आपल्याला यशाच्या शिखरावर नेतात.
किशोर कदम हे देखील प्रचंड लोकप्रिय कलाकार आहेत, यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये “गोदाकाठ”, “आवांच्छित” या सिनेमातील भूमिकांसाठी किशोर कदम यांना पुरस्कार मिळाला आहे. याच निमित्ताने किरण माने यांनी किशोर कदम यांच्यासाठी लिहलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्यांची मैत्री नव्याने खुलली आहे, किरण माने आणि किशोर कदम यांची जोडी तुम्हाला कशी वाटते ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच आजचा हा लेख कसा वाटला ते देखील कमेन्ट करून सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.