हे दाक्षिणात्य स्टार्स आहेत खऱ्या आयुष्यात भाऊ! आहे एकमेकांवर खूप प्रेम…
बॉलिवूड मधील बहीण-भावांच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. तशाच काही जोड्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देखील आहेत. या आहेत भावाभावांच्या जोड्या. दक्षिणेतील काही स्टार्स हे असे आहेत जे खूप प्रसिद्ध आहेत. मात्र अनेकांना याची कल्पना नाहीये की या स्टार्सचे भाऊ देखील तितकेच यशस्वी आणि प्रसिद्ध अभिनेते आहेत. चला तर जाणून घेऊया अशाच काही जोड्यांबद्दल…
चिरंजीवी आणि पवन कल्याण
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चिरंजीवी आणि पवन कल्याण ही दोन नावे अशी आहेत ज्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. या दोघांनीही आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि दोघेही अजूनही चित्रपटसृष्टीत यशस्वीपणे कार्यरत आहेत. दोघेही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहेत. यांच्या केवळ नावावर चित्रपट हिट झालेले आहेत.
महेश बाबू आणि रमेश बाबू
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अजून एक गाजलेलं नाव म्हणजे महेश बाबू. आपल्या कूल अंदाजाने प्रत्येक चित्रपट हिट करणारा कलाकार. महेश बाबूला एक मोठा भाऊ आहे. त्याच्या या खऱ्या भावाचे नाव रमेश बाबू असून तो देखील एक अभिनेता आहे. तसेच रमेश बाबू एक निर्माता आणि दिग्दर्शक देखील आहे.
ज्युनियर एनटीआर आणि कल्याण राम
आपल्या दमदार अभिनय आणि धमाकेदार ऍक्शनने प्रेक्षकांची मने जिंकून घेणारा अभिनेता म्हणजे ज्युनियर एनटीआर. ज्युनियर एनटीआरच्या भावाचे नाव कल्याण राम असून तो देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. ज्युनियर एनटीआर आणि कल्याण राम हे दोघे सख्खे भाऊ नाहीत. मात्र दोघांमधील प्रेम हे सख्ख्या भावापेक्षा कमी नाही. अनेकदा दोघे एकत्र दिसून येतात.
अल्लू अर्जुन आणि अल्लू शिरीष
एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारा स्टार अभिनेता म्हणून अल्लू अर्जुनचे नाव घेतले जाते. अलीकडेच त्याच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ माजवला असल्याचे दिसून आले. अल्लू अर्जुनचा भाऊ देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. त्याचे नाव आहे अल्लू शिरीष. तो अल्लू अर्जुनचा मोठा भाऊ आहे. त्यानेही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. अल्लू अर्जुन इतके यश मात्र त्याला अजून मिळवता आलेले नाही.
सूर्या आणि कार्ती
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक हिट चित्रपट देणारा कलाकार म्हणजे सूर्या. नुकताच त्याचा ‘जय भीम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याने या चित्रपटात केलेले काम हे खूपच कौतुकास्पद आहे. त्याने यात खूपच सहजसुंदर अभिनय केला आहे. सूर्याला एक भाऊ असून त्याचे नाव कार्ती आहे. कार्ती देखील अनेक अभिनेता असून तो देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध आहे.