भल्या भल्यांना वेड लावणाऱ्या या दाक्षिणात्य अभिनेत्री विना मेक अप दिसतात अशा…त्यांचा हा लूक पाहून व्हाल हैराण..

0

अभिनय आणि सौंदर्य यांची सांगड असली की अभिनेत्री अनेकांना घायाळ करते. ग्लॅमरस अदा आणि परफेक्ट लूक साठी नेहमी मेक अपचा आधार घ्यावा लागतो. किंबहुना तो एक प्रघातच पडला आहे. शूटिंग असो की पार्टी अभिनेत्री या मेक अपने झाकलेल्याच असतात. सुंदरतेच्या बाबतीत दाक्षिणात्य अभिनेत्री बऱ्यापैकी आघाडीवर असलेल्या आढळतात. पण तुम्हाला माहीत आहे का? विना मेक-अप या अभिनेत्री कशा दिसतात? नाही ? चला तर जाणून घ्या या काही प्रसिद्ध अभिनेत्री विना मेक-अप अशा दिसतात..

१) नयनतारा
रजनीकांत, सूर्या अशा दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेयर करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा अनेकवेळा बिना मेकअप आउटिंग करताना पाहायला मिळत असते. शाहरुख खान अभिनित डायरेक्टर एटली कुमारच्या जवान चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे. अभिनेत्री नयनताराच्या नॅचुरल ब्यूटीचे लोक खूपच कौतुक करतात.

२) समांथा प्रभू
उ अंटवा या गाण्याने सध्या सर्वत्र लोकप्रिय असलेली समांथा रुथ प्रभू साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ईगा चित्रपटामध्ये आणि फॅमिली मॅन सारख्या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळालेली समांथाचे सोशल मिडिया अकाऊंटवर उघडून बघितले तर त्यामध्ये तिचे अनेक बिना मेकअप फोटो पाहायला मिळतील.ज्यामधे तिचे खरे सौंदर्य दिसून येते.

३) रश्मिका मंदाना आता
नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध क्यूट आणि हॉट अशी रश्मिका मंदानामिशन मजनू चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री करणार आहे. तिने साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये गीता गोविंदम, डियर कॉमरेड आणि पुष्पा सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सोशल मिडियावर लाईवदरम्यान नेहमी बिनामेकअप पाहायला मिळते.

४) तमन्ना
बाहुबली फेम साउथ इंडियन प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटीयाने हिंदी चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तमन्नाला बिना मेकअप ओळखणे खूपच कठीण आहे. तथापि तिचे चाहते तिच्या या फोटोंवर देखील भरपूर प्रेम करतात.

५) अनुष्का शेट्टी
बाहुबली चित्रपटामधील आणखीन एक मुख्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा बिना मेकअप लुक पाहिल्यास तुम्ही तिला काही वेळ ओळखू देखील शकणार नाही. तिचा बिना मेकअपचा लुक खूपच हैराण करतो. तथापि या अवतारामध्ये देखील तिचे सुंदर हास्य लोकांचे हृदय जिंकण्यात कसूर करत नाही.

६) प्रिया वॉरियर
उरू अदर लव चित्रपटामधील एका सीनमध्ये डोळा मारून लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलेली अभिनेत्री प्रिया वॉरियर रातोरात स्टार बनली होती. प्रियाला बिना मेकअप पाहून तिला ओळखणे देखील खूप कठीण जाईल. लोक मेकअपशिवाय तिचा चेहरा पाहून नेहमी हैराण होतात..

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप