मराठी मालिकेत काम करणाऱ्या या अभिनेत्री घेतात इतके मानधन.. आकडा ऐकून व्हाल चकित..

0

झी मराठी वाहिनी ही प्रेक्षकांची सर्वात लाडकी आणि आवडती वाहिनी आहे. या वाहिनीवर अनेक नव्या मालिका येऊ घेतल्या आहेत. दरम्यान या मालिकांमधील नायिका देखील खूप पसंत केल्या जातात. मालिकेतील नायिकांनी अल्पावधीतच लोकप्रियता संपादित केली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का ? या नायिका मालिकेच्या एका भागासाठी किती मानधन घेतात ? जाणून घ्या आजच्या या लेखात..

प्रार्थना बेहेरे
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील नेहा अर्थात प्रार्थना बेहेरे हिने नेहाचे पात्र उत्कृष्टरित्या साकारले आहे. मालिकेतील तिची आणि यश म्हणजेच श्रेयसची केमिस्ट्री चाहत्यांना फारच भावली आहे. प्रार्थना मालिकेच्या एका भागासाठी ४० हजार रुपये इतके मानधन आकारते.

सानिया चौधरी
दार उघड बये मालिकेत ती मी मुक्ता ही भूमिका साकारत आहे. यासोबतच ती संबळ वादक दाखवली आहे. मंदिरात संबळ वाजवते. तिने या भूमिकेसाठी संबळ वादनाचं आवर्जून प्रशिक्षण घेतलं. ती या मालिकेच्या एका भागासाठी २३ हजार इतके मानधन आकारते.

शिवानी नाईक
अप्पी आमची कलेक्टर मालिकेत शिवानी नाईक ही अप्पी अर्थात अपर्णा सुरेश माने हे पात्र साकारते आहे. तिने अनेक व्यावसायिक नाटकातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ती मालिकेच्या एका भागासाठी १२ हजार रुपये इतके मानधन घेते.

पल्लवी पाटील
नवा गडी नवं राज्य मालिकेत आनंदीची भूमिका साकारणारी पल्लवी पाटील मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. ती या मालिकेच्या एका भागासाठी २० हजार इतके मानधन घेते.

तीतीक्षा तावडे
सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत नेत्राची भूमिका साकारणारी तीतिक्षा तावडे मालिकेत पुढे काय होईल हे सांगण्याची शक्ती अंगी बाळगते. ती मालिकेच्या एका भागासाठी १७ हजार इतके मानधन घेते.

दीपा चौधरी
स्त्रियांची कहाणी सांगणाऱ्या तू चाल पुढे या मालिकेत दीपा चौधरी एका गृहिणीची भूमिका साकारली आहे जीची स्वप्ने तिच्यासाठी खूप मोठी आहेत. ती या मालिकेच्या एका भागासाठी ३० हजार रुपये इतके मानधन आकारते. तिने अनेक हिंदी मालिकेत देखील आपल्या अभिनयाने चाहत्यांना आपलेसे केले आहे.

शिल्पा तुळसकर
तू तेव्हा तशी मालिकेत अनामिका दीक्षित चे पात्र साकारत आहे. अभिनेता स्वप्नील जोशी सोबतची तिची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. ती मालिकेच्या एका भागासाठी ३५ हजार रुपये इतके मानधन घेते. तिने अनेक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.