मराठी चित्रपट सृष्टीतील या अभिनेत्री घेतात इतके मानधन.. आकडा ऐकून व्हाल हैराण.

सिनेमाशी निगडित प्रत्येक गोष्ट चाहत्यांना जाणून घेण्यात एक आगळाच रस असतो. कलाकारांची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ तर बातम्यांचा भाग असतेच. दरम्यान, बॉलीवूड कलाकारांच्या मानधनाविषयी आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या बातम्या सतत चर्चेत असतात.कारण मानधनावरून त्या कलाकाराची ब्रॅंड वॅल्यू ठरत असते. याबरोबरच आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतदेखील असे खूप कलाकार आहेत जे सर्वाधिक मानधन घेतात म्हणून प्रसिद्ध आहेत. चला तर जाणून घेऊया अशा मराठी अभिनेत्री बद्दल ज्यांचे एका चित्रपटाचे मानधन अंदाजे लाखोंच्या घरात आहे.

सोनाली कुलकर्णी
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दोन सोनाली कुलकर्णी आहेत. त्यापैकी ज्येष्ठ सोनाली कुलकर्णी या आजही चित्रपटांमध्ये आपली अभिनयाने सर्वत्र खळबळ माजवण्यात पटाईत आहे. सोनालीने मराठी सोबतच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘दिल चाहता है’मधली तिची भूमिका विशेष गाजली होती.तिने आपल्याला ‘गुलाबजाम’, ‘कच्चा लिंबू’, ‘ देऊळ’ आणि बरेच चांगले सिनेमे दिले आहेत. सोनाली कुलकर्णी एका चित्रपटासाठी सुमारे ३८ लाख रुपये आकारते.

अमृता खानविलकर
सध्या चंद्रा बनवून साऱ्यांना आपल्या तालावर नाचायला लावणारी अमृता खानविलकरमराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आजवर ‘अर्जुन’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘वेलकम जिंदगी’, ‘आयना का बायना’ अशा अफलातून चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांना वेडे केले. ती प्रत्येक चित्रपटासाठी तिला अंदाजे ५० लाख रुपये मानधन मिळते.

सोनाली कुलकर्णी
महाराष्ट्राला आपल्या अदाकारीने घायाळ करणारी अप्सरा म्हणून सोनाली कुलकर्णीची ख्याती आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त मागणी असलेली अभिनेत्री बनली. सध्या मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अष्टपैलू स्टार्सपैकी ती एक आहे. ‘क्षणभर विश्रांती’, ‘मितवा’,, ‘क्लासमेट्स’ इत्यादी मधील भूमिकांसाठी ती प्रसिद्ध झाली. ‘नटरंग’ने तिला ओळख दिली. सोनाली कुलकर्णी एका चित्रपटासाठी अंदाजे १.५ कोटी रुपये मानधन आकारते.

प्रार्थना बेहेरे
अभिनेता स्वप्नील जोशी सोबत मितवा या सुंदर चित्रपटातून गाजलेली प्रार्थना सध्या झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीम गाठ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. दरम्यान तिने मराठी चित्रपट सृष्टीत मितवा सोबतच जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा,कॉफी आणि बरंच काही या, मिस्टर ॲन्ड मिसेस सदाचारी अशा चित्रपटात काम केले. ती प्रत्येक चित्रपटासाठी ९५ लाख इतके मानधन घेते.

प्रिया बापट
‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हॅपी जर्नी’, ‘आम्ही दोघी’ या चित्रपटांतील अनोख्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. निखळ आणि निर्मल अभिनयासाठी अनेकजण तिचे चाहते आहेत. ती प्रत्येक चित्रपटासाठी ती अंदाजे ४५ लाख रुपये घेत असल्याचे सांगितले जाते.

तेजश्री प्रधान
ती सध्या काय करते चित्रपटातून मराठी सिनेमासृष्टीत पाऊल ठेवणारी तेजश्री एक उत्कृष्ट सून म्हणून प्रसिद्ध आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे ६७ लाख रुपये आकारते.

रिंकू राजगुरू
सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू आता चित्रपट सृष्टीत यशाचे शिखर गाठत आहे. तिने यानंतर कागर, झुंड, सिनेमात काम केले. ती तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे २३-२५ लाख इतके मानधन घेते.

तेजस्विनी पंडित
सध्या रानबाजार या वेब सिरीज मधून साऱ्यांना आपल्या बोल्ड अंदाजाने वेडे करणारी तेजस्विनी तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे ४३-४५ लाख इतके मानधन घेते.

मृण्मयी देशपांडे
चंद्रमुखी सिनेमात दामिनी ची उत्कृष्ट भूमिका साकारणारी मृण्मयी ही अतिशय सुंदर अभिनेत्री तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे ३० लाख इतके मानधन आकारते.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप