बिग बॉस सिझन ४ मध्ये हे कलाकार होणार सहभागी.. यादी आली समोर

0

बिग बॉस मराठी’ या रिएलिटी शोचा वेगळा ऑडियन्स आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सीझनची घोषणा काहि दिवसांपूर्वी करण्यात आलीये. त्यामुळे या आगामी सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या नावाबाबत देखील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या अनेक कलाकारांच्या नावाच्या चर्चा सध्या सुरु आहेत. अशातच आता कार्यक्रमात टेलिव्हिजनवरील या शोमध्ये दिसणार आहेत ज्यांची नावं समोर आली आहेत.

दरम्यान, कलर्स मराठी ने आपल्या ऑफिशीयल इंस्टाग्राम पेजवर अनेक प्रोमो शेयर केले आहेत. या व्हिडिओत होस्ट महेश मांजरेकर हटके अंदाजात शोची सुरुवात होत असल्याचे बोलत आहेत. सोबतच ते म्हणतात,”कितीही सांगितलं तरी घराचा आखाडा व्हायला वेळ लागत नाही आणि समजा कोणी कोणाची खोडी काढली तर शिट्टी वाजली.” या व्हिडिओला साजेस कॅपशन देण्यात आले आहे.

तयार झालाय BIGG BOSS मराठीचा आखाडा ! आता मास्तरांनी शिट्टी वाजण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी! “BIGG BOSS मराठी” Grand Premiere, 2 ऑक्टोबरला संध्या 7 वा, सोम – शुक्र रात्री 10 वा, शनि – रवि रात्री 9:30 वा फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @voot

यानंतर आणखी एक व्हिडियो प्रदर्शित झाला आहे ज्यात म्हणत आहेत, “स्वभावाने तडकेफड येतेय गाजवायला BIGG BOSS मराठीचं घर… “BIGG BOSS मराठी” Grand Premiere, 2 ऑक्टोबरला संध्या 7 वा, सोम – शुक्र रात्री 10 वा, शनि- रवि रात्री 9:30 वा फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @voot ”

या प्रोमो मुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे आणि शो मध्ये कोण कोण झळकणार सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर आहेत. सुत्रांनुसार या सीझनमध्ये किरण माने, निखिल राजेशिर्के, अक्षय केळकर, अमृता ढोंगडे, किरण माने, समृद्धी जाधव, अनिकेत विश्वासराव, रुचिरा जाधव, प्रसाद जावडे हे कलाकार झळकणार आहेत. पण ही अधिकृत नाहीत पण ही नावं सध्या चर्चेत आहेत.

याच बरोबर या कार्यक्रमात टेलिव्हिजनवरील एक प्रसिध्द सेलिब्रिटी कपल दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. ही जोडी म्हणजे अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण अभिनेत्री स्नेहा चव्हाण मराठी मालिकेत काम करुन अख्या महाराष्ट्राची मनं जिंकली.

सुत्रांकडून मिळालेल्या या महितीवर अद्याप तरी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान हार्दिक जोशी च्या नावाचीही जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे बिग बॉस मराठी ४ मध्ये नेमके स्पर्धक कोण आहेत हे पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप