टीम इंडिया मधील लोकप्रिय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री यांच्यात सुरू आहे वाद! धनश्रीने सोशल मीडियावरील आडनाव का टाकलं काढून?

क्रिकेटर आणि त्यांचे वैवाहिक आयुष्य याबद्दल सर्वांनाच अतिशय उत्सुकता लागलेली असते. असेच काहीसे यावेळी घडले आहे. यावेळी युझवेंद्र चहलची बायको धनश्री वर्मा हिने तिचे इंस्टाग्राम वरील नाव बदलले आहे. याआधी ती धनश्री वर्मा चहल असे लिहीत होती मात्र यावेळी तिने फक्त धनश्री वर्मा असे नाव लिहिले आहे. धनश्रीने केलेल्या याच बदलानंतर युझवेंद्रने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत त्यात ‘न्यू लाइफ लोडिंग” असे कॅप्शन दिले होते.

 

भारतीय संघातील प्रसिद्ध फिरकीपटू असलेल्या युझवेंद्रने काही काळाकरिता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून ब्रेक घेतलेला आहे. या ब्रेकनंतर तो थेट एशिया कप मध्ये खेळताना दिसणार आहे. सध्या तो क्रिकेट जरी खेळत नसला तरी एका वेगळ्याच कारणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. याबाबत त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. दरम्यान त्याची बायको धनश्री हिने देखील तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर काही बदल केल्याचे समजते. या दोन्ही बाबींवरूनच त्यांच्या वैवाहिक आयुष्याच्या नात्यासंबंधीच्या प्रश्नांना उधाण आलेलं दिसतंय.

दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियाचा इंस्टाग्राम हॅण्डलवर केलेल्या या बदलामुळे आणि दिलेल्या अपडेट मुळे सोशल मीडियावर या दोघांच्याही बाबतीत जोरदार चर्चा रंगलेली दिसत आहे. यामध्ये त्यांच्या काही फॅन्सनी दोघांच्याही नात्यात काहीतरी बिघडलं आहे असे अंदाज आणि शक्यता वर्तवल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

फॅन्सकडून विचारण्यात येणाऱ्या या प्रश्नावर युझवेंद्रने त्याचे मत मांडत पुन्हा एकदा इंस्टाग्रामला एक पोस्ट शेअर करत या चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे भारतात जेव्हा पहिल्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला त्यावेळी युझवेंद्र आणि धनश्री यांचे काही एकत्रित फोटो मीडियावर व्हायरल होत होते. यानंतर दोघांनी थेट २०२० मध्ये लग्न करत आपल्या फॅन्सला एक आश्चर्याचा गोड धक्का दिला!  युझवेंद्रची बायको धनश्री ही व्यवसायाने एक कोरिओग्राफर असून ती कायमच तिच्या हटके डान्सच्या व्हिडिओज मुळे चर्चेत असते.

भारतीय संघामधील एक प्रमुख आणि प्रसिद्ध चेहरा असलेल्या युझवेंद्रने सध्या इंटरनॅशनल क्रिकेट मधून ब्रेक घेतलेला आहे. यादरम्यान भारतीय संघ ही झिंबाब्वेच्या दौऱ्यावर गेलेला आहे, त्यामुळे युझवेंद्र हा आता त्याच्या चाहत्यांना डायरेक्ट एशिया कप मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे.

आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द युझवेंद्रने २०१६ च्या दरम्यान सुरू केली. त्यावेळी त्याने ६७ वनडे मध्ये ११८ विकेट्स आणि ६२ t20 मध्ये ७९ विकेट घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर त्याने इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल मधील १३१ सामन्यांमध्ये १६६ विकेट्स आतापर्यंत घेतल्या आहेत. सध्या तो राजस्थान रॉयल्स या संघामधून खेळताना दिसला आहे.

Leave a Comment

Close Visit Np online