“छत्रपती शिवाजी महाराजांची” मूर्ती दिसताच रोहित शर्माने उद्गारले असे शब्द…सर्वजण झाले भावुक…

मित्रहो छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की अंगात आपोआप विररस संचारतो, फक्त महाराष्ट्रालाच न्हवे तर अवघ्या जगाला त्यांनी मोलाची शिकवण दिली आहे. आजही शेकडो वर्षांनंतर देखील त्यांच्या पराक्रमाचे धडे शिकवले जातात आणि म्हणूनच या भूमीवर त्यांचे नाव जरी कानावर पडले तरीही मोठया उत्साहाने त्यांचा जयजयकार केला जातो. नुकताच सोशल मीडियावर त्यांच्या जयजयकाराचा व्हिडीओ पाहण्यात येत आहे, खास गोष्ट अशी की या व्हिडीओच्या माध्यमातून रोहित शर्मा चांगलाच चर्चेत आला असून यातील त्याचे कृत्य पाहून चाहते मंडळी फिदा झाली आहेत.

 

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा,सुर्यकुमार यादव आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी लाईव्ह व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्या सोबत गप्पा मारत असताना रोहित घरातील ट्रॉफी वगैरे दाखवत होता, त्याच्या एका चाहत्या सोबत बोलत असतानाच त्याचे लक्ष घरातील असलेल्या महाराजांच्या मूर्तीकडे गेले. मूर्ती पाहताच त्याने महाराजांच्या नावाचा जयघोष केला. त्याचे वाक्य ऐकताच व्हिडीओ कॉल वर उपस्थित मंडळींनी देखील या जयघोषाचा आदर करत “विजय असो” हे वाक्य उद्गारले व सोशल मीडियावरील वातावरण नव्याने खास बनवले.

या व्हिडीओ मध्ये रोहित शर्मा आणि सुर्या हा आपल्या एका जुन्या सहकाऱ्याशी बोलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नेटकरी हा व्हिडीओ आवर्जून पाहत आहेत. व्हिडीओ मध्ये घरातील महाराजांची मूर्ती दिसताच रोहित भावुक झालेला पाहायला मिळतो, त्याने मूर्तीला पाहताच “छत्रपती शिवाजी महाराज की जय” असा जयघोष केला. त्याचा हा जयघोष अनेकांचे लक्ष वेधून घेत असून त्याच्या उच्च विचारांची एक नाजूक झलक इथे पाहायला मिळत आहे. अनेकांना त्याच्या तोंडून हा जयघोष ऐकायला आवडत आहे.

त्याच्या या व्हिडीओ चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला असून यावर कमेंट्स सुद्धा भरभरून येत आहेत. रोहित आपल्या सहकाऱ्याशी गप्पा मारत होता, सुरुवातीला त्याला विश्वासच बसत नव्हता की रोहित त्याच्या सोबत गप्पा मारतोय. रोहित आपल्या सोबत ऑनलाइन आहे ही गोष्ट तो आपल्या कुटुंबियांना मोठ्या आनंदाने सांगताना दिसत आहे. रोहित त्याला आपल्या घरातील त्याला मिळालेल्या क्रिकेट ट्रॉफीन दाखवत असतो दरम्यान त्याला ट्रॉफीजच्या शेजारी शिवाजी महाराजांची मूर्ती स्थित असलेली दिसते व रोहित सावध होतो आणि त्यांच्या नावाचा जयघोष करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Universe मराठी (@universe.marathi)

रोहित भारताचा लाडका, आवडता लोकप्रिय खेळाडू आहे. सोशल मीडियावर त्याचे अनेकजण फॉलोअर्स तर आहेतच शिवाय तिथे सुद्धा चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. त्याच्या प्रत्येक पोस्टवर नेटकरी आवर्जून कमेंट्स करत असतात, आणि लाईक्सचा तर पाऊस पडतच असतो. भारतीय क्रिकेट टीम मधील तो एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नावारूपाला आला आहे. त्याला नेहमी अशीच लोकप्रियता आणि त्याच्या करिअर मध्ये यश मिळत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Comment

Close Visit Np online