मोहोम्मद शमीच्या बायकोचा व्हिडीओ सोशल मीडियावर येतोय चर्चेत…”प्यार-व्यार नहीं होता मुझसे…”

मित्रहो सोशल जगतात सेकंदाला कोणीतरी विशेष चर्चेत येत असते, अनेक लोक यावर निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून लक्ष वेधून घेत असतात. कधी अभिनेत्री वर्ग तर कधी अभिनेता वर्ग आणि त्यांच्याहुन अधिक इतर लोक देखील आपली कला सादर करत असतात. मित्रहो आज हा विषय खास खुलवण्यासाठी मोहोम्मद शमीच्या बायकोचा व्हिडीओ समोर येत आहे. सोशल मीडियावर सध्या या व्हिडीओ धुमाकूळ घातला असून लोकांचे लक्ष वेधून घेण्यात काहीच कसर बाकी सोडली नाही. चर्चेत येण्याचे खास कारण काय आहे ते आपण या लेखातून पुढे जाणून घेऊ.

 

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि स्टार मोहोम्मद शमी सध्या ब्रेकवर आहे. आशिया चषक आणि त्यानंतर तो टी-२०  विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळणार आहे. खूपसे भारतीय मोहोम्मदला आणि त्याच्या खेळातील कामगिरीला पसंत करतात. तो इतका लोकप्रिय जरी असला तरीही सोशल मीडियावर तो जास्त सक्रिय नसतो, मात्र त्याची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते. रोजच ती काहीतरी पोस्ट करत असते त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरील तिचा ऍक्टिव्हनेस सर्वाना कळतोच. खूपसे फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते.

मोहोम्मद आणि हसीन यांची जोडी अनेकांना आवडते, मात्र काहीशा वादामुळे हे दोघे एकत्र राहत नाहीत. पण चाहत्याना मात्र या दोघांचीही वेळोवेळी खबर असतेच. नुकताच हसीन जहाँने एक व्हिडिओ शेअर केला आहे, हा व्हिडीओ विशेष लक्षवेधी ठरत आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ खूपच आकर्षक आहे, यामध्ये हसीन एक डॉयलॉग बोलताना दिसत आहे. व्हिडीओ मध्ये ती म्हणते “ये प्यार व्यार नहीं होता मुझसे, लढाई करनी है तो बोलो.” या व्हिडीओने इंटरनेट जगतात तुफान चर्चा पसरवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by hasin jahan (@hasinjahanofficial)

तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे, सोबतच कमेंट्स देखील भरभरून केल्या आहेत. त्यातील एक कमेन्ट अशी आहे की “तुम्ही शमीशी भांडण केले होते, शमीभाई कंटाळून सोडून गेला.” अशाच निरनिराळ्या कमेन्ट सोशल मीडियावर येत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रचंड लक्षवेधी ठरला असून शमी आणि हसीन जहाँ यांचे नाते पुन्हा  चर्चेत आले आहे. त्यांना अनेकजण प्रश्न देखील विचारत आहेत, तर काहीजण व्हिडीओ वरून मनोरंजन करून घेत आहेत. हसीन त्यामुळे आणखीनच पॉप्युलर होत आहे.

मोहोम्मद शमी आणि हसीन जहाँ या दोघांनी २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली होती. या दांपत्याला एक मुलगी देखील आहे. मोहोम्मद शमी हा सुद्धा सोशल मीडियावर थोडाफार सक्रिय असतो, तो आपल्या मुलीचे काही फोटो चाहत्याना शेअर करत असतो. हसीन जहाँने २०१८ मध्ये मोहोम्मद शमीवर अनेक प्रकारचे आरोप केले होते. त्यामुळे मग नंतर त्यांच्यात मोठा वाद झाला. त्याच्यावर तिने मारहाण, घरगुती हिंसाचार यांसारखे काही आरोप केले होते. मोहोम्मद शमी आणि हसीन जहाँला त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Comment

Close Visit uttamsheti