‘जीव माझा गुंतला’ मालिकेचा येणार हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला….
सध्या ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका धुमधडाक्यात सुरू आहे. जीव माझा गुंतला ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका बनली आहे. या मालिकेमध्ये मल्हार आणि अंतरा यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. आता मालिकांचा रिमेक करण्याचा धडाका देखील खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.
आतापर्यंत आपण पाहिले आहे की, हिंदी मालिकांच्या कहाणीवर आधारित मराठी मालिका बनवण्यात आल्या आहेत. मात्र, आता कदाचित पहिल्यांदाच मराठी मालिकेवरून हिंदी मालिका तयार होणार आहे. जीव माझा गुंतला या मालिकेची हिंदी मालिका आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आई कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असतं, फुलाला सुगंध मातीचा यासारख्या मालिका या हिंदी मालिकांच्या आधारे आधारावर मराठीत बनवण्यात आलेल्या आहेत.
या मालिकेच्या आधारावर तुझेच मी गीत गात आहे ही मालिका सध्या आपल्याला दिसत आहे. ‘गुम है किसी के प्यार के’ या मालिकेच्या आधारावर लग्नाची बेडी ही मालिका आपण पाहत आहोत. तर आता जीव माझा गुंतला या मालिकेचाही हिंदी रिमेक आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे.सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर सध्या जीव माझा गुंतला ही मालिका प्रसारित होत आहे.
अगदी अल्पवधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद आणि प्रेम मिळत आहे. खरंतर कन्नड मालिका ‘मिथुनराशी जी’चा ही मालिका मराठी रिमेक आहे. एकीकडे गर्भश्रीमंत, रुबाबदार, हट्टी पण तितकाच हळवा मल्हार तर दुसरीकडे कष्टकरू, स्वाभिमानी घर चालवण्यासाठी रिक्षा चालवणारी अंतरा यांच्यावर आधारित ही मालिका आहे. प्रेक्षकांना आणि खासकरुन तरुणाईला अंतरा-मल्हारची हटके केमिस्ट्री प्रचंड आवडते आहे. आणि विशेष म्हणजे ही मालिका कोल्हापूरच्या रांगड्या मातीत शूट केली जात आहे.
मालिकेत मल्हारची भूमिका अभिनेता सौरभ चौगुले याने साकारली आहे. अंतराची भूमिका अभिनेत्री योगिता चव्हाण हिने साकारली आहे.सध्या ही मालिका मराठीत गाजतच आहे. मात्र, हिंदीमध्ये देखील या मालिकेचा रिमेक करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
हिंदीमध्ये आपल्याला लवकरच ही मालिका ‘सावी की सवारी’ या नावाने दिसणार आहे. या नावाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या मालिकेचा प्रोमो देखील सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ‘सावी की सवारी’ या मालिकेमध्ये सावी ही भूमिका समृद्धी शुक्ला करणार असल्याचे सध्या तरी सांगण्यात येत आहे.
View this post on Instagram