सध्या मनोरंजन क्षेत्रात लगीन सराईचा जणू सिझनच चालू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता प्रथमेश परबने आपल्या खास मैत्रिणीसोबत एक फोटो शेयर केला होता. त्यावर ती त्याची गर्लफ्रेंड आहे का? यावर नेटकरी चर्चा करत होते. आणि त्याने २ दिवसांपूर्वी पोस्ट करत लग्नाला यायचं हं असं आमंत्रण दिलं होतं. त्याची पोस्ट बघून चाहत्यांनी अनेक तर्कवितर्क लावले होते. तो खरच लग्न करतोय का? असा प्रश्न नेट कऱ्याना पडला होता.
पण खरंतर प्रथमेश खऱ्या आयुष्यात नाही मात्र रुपेरी पडद्यावर बोहल्यावर चढताना दिसणार आहे. ‘ढिशक्यांव’ या आगामी चित्रपटात प्रथमेश मुख्य भुमिकेत दिसत आहे.
प्रथमेशने आगामी ‘ढिशक्यांव’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट केलं.यामध्ये प्रथमेश मुंडावळ्या बांधून लग्नासाठी तयार दिसतोय पण लग्नमंडपात नाही तर तुरुंगात.प्रथमेशची बायको सुद्धा तुरुंगात दिसतेय आणि तिच्या हातात चक्क बंदूक आहे.तर प्रथमेश सोबत एक त्याचा मित्रही दिसत आहे.एकाची मस्ती, आन दुसऱ्याची ट्यांव-ट्यांव,इश्काच्या जेलमध्ये, नुसताच ढिशक्यांव!असे भन्नाट कॅप्शन देत पोस्टर टाकण्यात आलं आहे.हा नेमका गोंधळ काय आहे हे १० फेब्रुवारी २०२३ लाच कळेल.
सोशल मीडियावर प्रथमेशने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रथमेश नवरदेवाच्या लुकमध्ये दिसत आहे. त्याने शेरवानी परिधान केली असून डोक्याला मुंडावल्या बांधल्या आहेत. तसेच हाहात हार धरला आहे. नवरदेवाच्या लुकमधला फोटो शेअर करत प्रथमेशने लिहिलं आहे,”सगळेच विचारत आहेत… विचार केला सांगूनच टाकू… गुरुवारपर्यंत काय ते कळ काढा”
यंदाच्या दिवाळीत प्रथमेशने एका मुलीसोबत फोटो पोस्ट करुन चाहत्यांना सरप्राईजच दिले होते. क्षितिजा घोसाळकरसोबत त्याने दिवाळीला फोटो टाकला होता.चाहत्यांनी तर प्रथमेशला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. प्रथमेशला खऱ्या आयुष्यातली प्राजू भेटली अशा शब्दात प्रथमेशच्या या पोस्टचे स्वागत करण्यात आले. मात्र प्रथमेशचं हे लग्न खऱ्या नाही तर रुपेरी पडद्यावर ठरलं आहे हे स्पष्ट झालंय.
View this post on Instagram
प्रथमेशने शेअर केलेल्या फोटोवर आमचं ठरलं आहे… लग्नाला यायचं ह… पत्रिका गुरुवारी पाठवतोय, असं लिहिलं आहे. प्रथमेशचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रथमेशचे चाहते त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आता प्रथमेशने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.