शूटवर जाण्याआधी क्रिकेटने केला घात, ‘भाभीजी घर पर है’ मधील मलखान यांचे दुःखद निधन

नुकताच आलेल्या माहितीनुसार टीव्ही चॅनेल वरील सुप्रसिद्ध हिंदी मालिका भाभीजी घर पर है या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते मलखान यांचे नुकताच निधन झाले आहे. या बातमीमुळे सध्या टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. ४१ वर्षांचे अभिनेते दीपेश यांच्या अचानक निधन झाल्यामुळे त्यांचे सहकलाकार आणि इतर अन्य व्यवस्थापक शोकमध्ये बुडाले आहेत. दीपेश क्रिकेट खेळत होते आणि क्रिकेट खेळत असतानाच अचानक ते जमिनीवर पडले. त्यानंतर लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

भाभीजी घर पर है या मालिकेत मोहनलाल तिवारी हे पात्र साकारणारे रोहित जी यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की आज आमचा शूट मध्ये जाण्याचा वेळ उशिराने होता तर मला असे वाटते की ते जिम नंतर क्रिकेट खेळायला जाऊया अशा विचाराने गेले असतील. त्यांचे दररोजचे रुटीनतेच होते. परंतु खेळत असताना ते अचानक जमिनीवर कोसळले. ही बातमी आमच्या सर्वांसाठीच खूप धक्कादायक आहे.

मालिकेत पात्र साकारणारे मोहनलाल तिवारी म्हणाले की दीपेश त्या लोकांमध्ये होते जे आपल्या शरीराची खूप काळजी घेत असत. ते आपल्या शरीराची खूप निगा राखत असत पण तरीही हे असे कसे घडले हे मला समजत नाही आहे. मी आणि माझी संपूर्ण टीम सध्या आम्ही त्यांच्या घरी आहोत.

भाभीजी घर पर है या मालिकेचे प्रोड्युसर यांनी देखील दीपेश हे आमच्या कुटुंबाचा भाग होते त्यांच्या जाणाने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे दीपेश भाई यांच्या अचानक जाण्याने आम्ही सध्या सगळेच शॉक झालो आहोत. ते देखील भाभीजी घर पर हैं मधील एक चांगले ऍक्टर होते. आम्ही त्यांना खूप मिस करू. ते आमच्या एका कुटुंबाचा भाग होते. या वाईट काळात देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला बळ देवो असे ते म्हणाले.

दीपेश भान हे मलखानच्या मजेदार व्यक्तिरेखेसाठी ओळखले जात होते. ‘भाबीजी घर पर हैं’ व्यतिरिक्त ‘सुन यार चिल मार’सह ‘कॉमेडी का किंग कौन’, ‘कॉमेडी क्लब’, ‘भूतवाला’, ‘एफआयआर’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत शिक्षण घेतल्यानंतर २००५ मध्ये दीपेश मुंबईत आले. मे २०१९ मध्ये दिल्लीत त्याचे लग्न झाले. जानेवारी २०२१ मध्ये दीपेश एका मुलाचे बाप झाले.

एक चांगलं दमाचा ऍक्टर प्रेक्षकांना आता यापुढे भाभीजी घर पर है या मालिकेत पाहायला मिळणार नाहीये. सध्या चाहता वर्ग हा त्यांचा जुना अभिनित भाभीजी घर पर है मधील एपिसोड पाहत आहे आणि त्यावर शोक व्यक्त करत आहे. आमच्या टीम कडून देखील दीपेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave a Comment

Close Visit uttamsheti