झी मराठी वाहिनीवर गेल्या काही काळात नवनवीन मालिका येऊ घातल्या आहेत. यापैकी अल्पावधतीच लोकप्रिय झालेल्या बस बाई बस या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आजपर्यंत अनेक महिला राजकारणी ते एकाहून एक सरस अभिनेत्रींनी हजेरी लावली आहे. दरम्यान आता या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. बस बाई बसच्या मंचावर अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी व्यक्तिगत आयुष्याबद्दल एक खुलासा केला आहे.
अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी त्यांची मनाला स्पर्षणारी प्रेमकहाणी सर्वांसोबत शेयर केली. यावरून लक्षात येते की शुभांगी गोखले आणि दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांची प्रेमकहाणी फारच हटके आहे. मोहन गोखले यांनी कमी वयातच जगाचा निरोप घेतला होता. शुभांगी गोखले वेळोवेळी त्यांची आठवण काढताना आढळून येतात. या दोघांची लेक अभिनेत्री सखी गोखले सुद्धा आपल्या वडिलांना आजही तेवढीच मिस करते. आता बस बाई बसच्या मंचावर अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी त्यांच्या लव्हस्टोरी बद्दल एक मजेदार किस्सा सांगितला आहे. अगदी बॉलिवूडच्या चित्रपटातील प्रेमकहाणीला लाजवेल असा हा किस्सा आहे.
View this post on Instagram
बस बाई बसच्या मंचावर शुभांगी गोखले आल्या असताना एक महिला म्हणाली कि, ”मी बॉलिवूडच्या रोमँटिक चित्रपटांची फॅन आहे. आपण या चित्रपटात नेहमी पाहतो कि हिरो एअरपोर्टवर धावत जात हिरोईनला थांबवतो. मला वाटत होतं हे फक्त चित्रपटातच घडतं. पण त्यानंतर मी तुमचा आणि सरांचा किस्सा ऐकला.”त्यावर उत्तर देत शुभांगी यांनी तो मजेदार आणि रोमँटिक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या कि, ”मोहनने मला गिफ्ट देण्यासाठी अक्ख विमान थांबवून ठेवलं होतं. तब्बल पंचवीस मिनिटं ते विमान आमच्या दोघांसाठी थांबलं होतं.” शुभांगी यांनी सांगितलेला हा किस्सा ऐकून सुबोध भावे सुद्धा आश्चर्यचकित झाला.
दरम्यान शुभांगी गोखले यांनी या शो दरम्यान मोहन गोखलेंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांचे पती मोहन गोखले 80 च्या दशकातील प्रसिद्ध स्टार्सपैकी एक होते. या अभिनेत्याने हिंदीसोबतच गुजराती आणि मराठी चित्रपटांमध्येही आपल्या भूमिकेने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते.एका लग्नाची तिसरी गोष्ट , मिस्टर योगी,श्रीयुत गंगाधर टिपरे, लापतागंज,हम हैंना, काहे दिया परदेस, राजा राणीची गं जोडी, येऊ कशी तशी मी नांदायला यांसारख्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये शुभांगी यांनी आपल्या अभिनयाने सर्वांचे मनोरंजन केले आहे.