‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेंचा नवीन चित्रपट, “नवी फिल्म, नवा आमचा पण अवतार..” म्हणत केले पोस्टर शेयर..
सोनी टिव्ही वाहिनीवर प्रसारित होणारा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोने गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांना अगदी पोट धरून हसायला लावलं आहे. इतकंच काय तर हा शो आज महाराष्ट्रातील घराघरात अगदी आवडीने पाहिला जातो.. शो मध्ये असणारे प्रभाकर मोरे, अरुण कदम, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे,वनिता खरात, नम्रता संभेराव दत्तू मोरे, पृथ्वीक प्रताप, आणि समीर चौघुले या विनोद वीरांनी त्यांच्या कॉमिक टायमिंग मुळे हा शो लोकप्रिय केला आहे. त्यांच्या भन्नाट अशा विनोद शैलीने प्रेक्षकांना लोटपोट करण्यात यानी महारथ मिळवली आहे. तर सर्वांना खळखळून हसवणाऱ्या समीर चौगुलेंनाही याच कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली.
विविध भूमिका अगदी चोखपणे बजावून आजवर अनेक मालिक व चित्रपटांतून त्यांनी अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. आता ते एक नव्या चित्रपटातून आणि नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समीर चौगुलेंनी चित्रपटातील त्यांच्या लूकचा फोटो शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिली आहे.
‘बांबू’ असं समीर चौगुलेंच्या नवीन चित्रपटाचं नाव आहे. येत्या २६ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. “नवी फिल्म, नवा आमचा पण अवतार…!!”, असं कॅप्शन त्यांनी शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, समीर चौगुलेंनी याआधी अनेक चित्रपटात काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘हवाहवाई’ चित्रपटात ते दिसले होते. ‘चंद्रमुखी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला बत्ताशा अजूनही सर्वांना हसवण्याचे काम करत आहे. त्यांची ही आजवरची सर्वात लोकप्रिय भूमिका ठरली.
यासोबतच सोनी मराठी टिव्हीवरच त्यांची एक नवी मालिका येऊ घातली आहे. ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे…’ या नवीन मलिकेबद्दल सांगत असताना समीर चौघुले म्हणाले, या विषयी समीरला म्हणाला, ‘ही कथा आहे पारगाव नावाच्या एका छोट्याशा गावातील पोस्टऑफिसची. ज्यावेळेला संपूर्ण देशातील पोस्ट ऑफिस उत्तम काम करत असतात त्यावेळेला ते पारगावचं पोस्ट ऑफिस असतं त्यांची कामगिरी चांगली होत नसते. त्यातच तेथील कर्मचारी संगणक युगाचा स्वीकार करतात आणि आपल्या पोस्ट ऑफिसला कसे भरभराटीचे दिवस येतात याची ही कथा आहे.
पुढे ते म्हणाले, ‘ही कथा आहे तेथील कर्मचाऱ्यांच्या संघर्षाची, त्यांच्या मेहनतीची, त्यांच्या सुख आणि दुःखाची आहे. भारतीय पोस्टाचा आजपर्यंतचा प्रवास हा वैभवशाली आणि गौरवशाली राहिलेला आहे. यामध्ये पोस्ट कर्मचाऱ्यांचे फार मोठे योगदान आहे.