मित्रहो गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणावर मनोरंजन करणारा शो “तारक मेहता..” खूप लोकप्रिय आहे, आपल्या अतरंगी भूमिकेतून या कलाकारांनी आजवर अनेकांना खळखळून हसवले आहे. म्हणून तर याच्या लोकप्रियतेची पातळी गगनाला भिडत आहे. मित्रहो तुम्ही सुद्धा यातील कलाकार व त्यांच्या अभिनयाला जाणून असाल, प्रत्येक भूमिका निराळी आहे. प्रत्येक भूमिकेचे महत्व तितकेच जास्त आहे त्यामुळे या शोमध्ये सर्वजण असावेच लागतात, त्यांच्या एकीमुळे हा शो वर्षानुवर्षे आपली लोकप्रियता टिकवून आहे.
मित्रहो यातील दयाबेनची भूमिका तर तुम्हाला माहीतच आहे, ही भूमिका अतिशय लोकप्रिय आहे. शोमधील दयाबेन आणि तिच्यामध्ये असणारे वैविध्य तिच्या भूमिकेला प्रचंड आकर्षक बनवते. म्हणून आजदेखील चाहते दयाबेनची शोमध्ये आतुरतेने वाट पाहत आहेत. दयाबेनची भूमिका अभिनेत्री दिशा वकानी निभावत होती, तिची लोकप्रियता आजही तितकीच तग धरून आहे. लोकांना या शोमधील दयाबेनची भूमिका प्रचंड आवडते, हा शो खास या भूमिकेमुळे गाजला आहे म्हणून तर लोक शोमध्ये दयाबेनला परत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
मध्यंतरी मीडिया रिपोर्ट्स नुसार समोर आले होते की दिशा वकानी पुन्हा या मालिकेत येणार आहे. पण या अफवा नंतर बंद झाल्या. मात्र आता शोचे निर्माते असित मोदी यांनी एक नवी घोषणा केली आहे, यामध्ये त्यांनी नवीन कलाकार पडद्यावर खास भूमिकेत झळकणार असल्याचे सांगितले आहे. लवकरच एक नवीन दयाबेन दर्शवली जाईल असेही ते म्हणाले आहेत.त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आता चांगलीच वाढली आहे, लवकरच शोमध्ये पुन्हा एकदा खळखळून हसण्याची संधी मिळणार.
मिळालेल्या माहितीनुसार असे समजले आहे की टीव्ही इंडस्ट्री मधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या सखूजा ही आपणाला लाडक्या दयाबेनच्या भूमिकेत दिसणार आहे अशी चर्चा सुरू होती पण पिंकविलाच्या रिपोर्ट्स नुसार ऐश्वर्या सखूजाने दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण ती म्हणते “की मी या शोचा भाग बनू शकत नाही. मी दयाबेनच्या भूमिकेसाठी टेस्ट दिली होती पण मला वाटत नाही की मी ही भूमिका निभावू शकेन.” दयाबेनसाठी आता कोण येईल याची अनेकजण वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
या शो ने आतापर्यंत जवळपास साडे तीन हजार एपिसोड पूर्ण केले आहेत. मध्यंतरी आणखी एक अशी बातमी आली होती की “हम पांच” टीव्ही शोमधील अभिनेत्री राखी विजय ही दयाबेनची भूमिका निभावणार आहे. पण दुसऱ्या रिपोर्ट्स नुसार ही बातमी देखील चुकीची निघाली. आता दयाबेनच्या भूमिकेसाठी कोण कलाकार अभिनेत्री पडद्यावर झळकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.