प्राजक्ताचा घायाळ करणारा मराठमोळा लूक होतोय व्हायरल.. तुम्ही पाहिलात का?
अख्या महाराष्ट्राला आपल्या मोहक अदाकारीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारी तरुणांची क्रश प्राजू अर्थात अभिनेत्री प्राजक्ता माळी अलीकडे चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहते. वारंवार थक्क करणारे फोटोज् पोस्ट करून ती चाहत्यांचे मन चोरण्यात अव्वल झाली आहे. आणि तिच्या या फोटोज् ना चाहते भरभरून प्रेम ही देतात. शिवाय कॉमेंट्स मधून तिचे कौतुक ही करतात.
दरम्यान,चाहते प्राजक्ता माळीच्या नऊवारी साडीतल्या सौंदर्यावर चाहते फिदा झाले झालेत.अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.प्राजक्ता माळी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.प्राजक्ता माळीने नुकतेच नऊवारी साडीतील फोटो शेअर केला आहे.प्राजक्ताने हा लूक गोंधळ डान्ससाठी केला होता.प्राजक्ता माळीने या लूकमधील बरेच फोटो शेअर केले आहेत.प्राजक्ताने लेट पोस्ट म्हणत हे फोटो शेअर केले आहेत. मराठी थाट असेही लिहिले आहे.प्राजक्ताच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहेतर एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, अप्सरा प्राजू.दुसऱ्या युजरने लिहिले की, फार बारीक झालीस बाई .. गाल कुठे गेले तुझे.
View this post on Instagram
प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. प्राजूने एखादी पोस्ट केली रे केली की ती क्षणात व्हायरल होते. प्राजक्ता सोशल मीडियावर रोज नवे फोटो शेअर करत असते. दरम्यान, प्राजक्ता माळी नुकत्याच एका अरंगेत्रम कार्यक्रमाला पाहुणी म्हणून गेली होती. तिथले काही निवडक आणि आकर्षक फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे तुफान व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
परवा एका “अरंगेत्रम्” ला प्रमुख पाहुणी म्हणून जाण्याचा योग आला… खूप दिवसांनंतर सबंध ‘मार्गम् बघून फार बरं वाटलं. तसा हा घरचाच कार्यक्रम होता….माझ्या गुरू श्रीमती स्वाती ताईची शिष्या सौ. ऋजूता जोग – माझी गुरूभगिनी, तिची शिष्या कु. आस्था वैद्य जणू बहीण… आणि मैथिली कुलकर्णी यांचं अरंगेत्रम् होतं. दोघींनी सुरेख नर्तन केलं.भारतीय नृत्य परंपरा पुढची पिढी पण जोपासतेय, बघून आनंद वाटतो…..
प्राजक्ताला देखील लहानपणापासून नृत्याची आवड होती. म्हणजेच तिनं नृत्यात विशारद आणि अलंकार केलं आहे. शिवाय तिचे पुण्यात ७ डान्स क्लासेस देखील आहेत. तिने आजवर डान्स आणि अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांचे मन जिंकले आहे .