मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये अभिनेता श्रेयस तळपदेने बरेच नाव कमावले आहे. मोठ्या पडद्याबरोबरच तो आता छोट्या पडद्यावरदेखील तो त्याची जादू गाजवत आहे. आपल्या दमदार अभिनय आणि किलर लूक्स मुळे श्रेयसने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सध्या छोट्या पडद्यावर रोमँटिक अंदाजामुळे तो चांगलाच ओळखला जातो आहे. पण तुम्हाला माहीत आहे का जितकी त्याची ऑनस्क्रीन लव्हस्टोरी रंजक आहे तितकीच ऑफस्क्रिन लव्हस्टोरी भन्नाट आहे. एखाद्या सिनेमाला शोभेल अशी ही लव्ह स्टोरी माहित आहे का?
View this post on Instagram
साधारणपणे अठरा वर्षांपूर्वी याच दिवशी श्रेयसने आपली बायको दीप्तीसोबत लग्नगाठ बांधली होती. आज हे दोघे सुखी संसार करत आहेत. श्रेयस आणि दीप्तीच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगायचे तर श्रेयस आणि दीप्ती यांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली होती.श्रेयस तळपदे ‘आभाळमाया’ या गाजलेल्या मालिकेत निशांत महाजनची भूमिका साकारत होता. या मालिकेमुळे श्रेयासला अमाप प्रसिद्धी मिळाली होती.
View this post on Instagram
याच प्रसिद्धीमुळे त्याला विनायक गणेश वझे महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी जीएस या पदावर दीप्ती देशमुख कार्यरत होती. दिप्तीने श्रेयासला फोनवरून आमंत्रित केले होते दरम्यान दोन ते तीन वेळा त्यांचा फोनवरून संवाद देखील झाला होता.
View this post on Instagram
श्रेयसच्या घरी त्याला निमंत्रण देण्यासाठी गेल्या होत्या. दिप्तीला समोर पाहताच श्रेयस तिच्या प्रेमातच पडला. श्रेयसच्या बाबतीत पहिल्या नजरेत झालेले प्रेम असे म्हटले तर वावगे ठरायला नको. कार्यक्रमात गेल्यावर श्रेयसची नजर दिप्तीकडेच खिळून राहिली होती. कार्यक्रम आटोपल्यावर दोघांनी एकमेकांना निरोप देखील दिला. परंतु श्रेयासच्या मनात काहीतरी वेगळेच घडत होते. शेवटी न राहवून अवघ्या पाच दिवसातच तो आणि दीप्ती भेटले आणि माझ्याशी लग्न करशील का? असे प्रपोज केले.
श्रेयसने प्रपोज करताच दीप्तीला धक्का बसला. एवढ्यात लग्नाचा विचार केला नसल्याचे सांगत आणि अमेरिकेला पुढील शिक्षणासाठी जावे लागणार या विचाराने तिने श्रेयासला साफ नकार दिला होता .
View this post on Instagram
दरम्यान दिप्तीचे अमेरिकेला जाणेही टळले शेवटी दोन ते अडीच वर्षांनी दिप्तीने श्रेयसला आपला होकार कळवळा. मानसशास्त्र तज्ञ ही पदवी प्राप्त झाल्यानंतर दिप्तीने श्रेयसबाबत घरच्यांना सांगितले तेव्हा घरच्यांनी देखील त्यांच्या लग्नाला संमती दिली. लग्नाची तारीख काढायची होती मात्र दिप्तीचे लग्न तिच्या मावशीच्याच मंगल कार्यालयात व्हावे असा हट्ट तिच्या मावशीचा होता.
३१ डिसेंबरला कार्यालय बुक नसल्याने शेवटी याच दिवशी लग्न करण्याचा निर्णय पक्का ठरला. ३१ डिसेंबर २००४ साली दीप्ती आणि श्रेयस यांचे मोठ्या थाटात लग्न पार पडले.